प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.२५, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी'दि प्रॉब्लेम ऑफ द रुपी : इट्स ओरिजिन ॲन्ड इट्स सोल्यूशन 'हा ग्रंथ शंभर वर्षांपूर्वी लिहिला होता .त्यातून त्यानी रुपयाचे मूल्य आणि रुपयाचे अवमूल्यन यासह चलन विषयक जी मांडणी केली ती आजच्या विषमतावादी अर्थव्यवस्थेत विचारप्रवृत्त करणारी आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यासाचा मूळ विषय अर्थशास्त्र हाच होता. बाबासाहेबांनी अर्थशास्त्रात विपुल लिखाण केले. ईस्ट इंडिया कंपनी पासून ब्रिटिश इंडिया पर्यंतच्या आर्थिक घडामोडींचे विश्लेषण त्यांनी केले. समन्यायी आर्थिक विकास व आर्थिक लोकशाही हाच त्यांच्या एकूणच सामाजिक-राजकीय विचारांचाही गाभा होता,असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिकं अभ्यास वर्गात व्यक्त करण्यात आले. 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी 'या पुस्तकाच्या शताब्दी निमित्त ' डॉ.आंबेडकरांचा अर्थविचार ' या विषयावर हे चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर , तुकाराम अपराध, अशोक केसरकर, दयानंद लिपारे ,पांडूरंग पिसे यांनी सहभाग घेतला. प्रारंभी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कार्यकर्त्या ऍड.दिलशाद मुजावर यांना आदरांजली वाहण्यात आली.
या चर्चासत्रात असे मत व्यक्त करण्यात आले करण्यात आले की,डॉ. आंबेडकर यांनी आदर्श चलन पद्धती, कृषी उद्योग, खासगी सावकार प्रतिबंधक विधेयक, जातीचे अर्थशास्त्र, आर्थिक पायाभरणी इत्यादी विषयावर विस्तृत लिखाण केले. भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापनेतही बाबासाहेबांचे मोठे योगदान आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत आर्थिक विषमतेचे बळी विषमतेचे बळी कोण ठरते हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. आर्थिक लोकशाही शिवाय सामाजिक व राजकीय लोकशाही निरुपयोगी ठरेल हा त्यांचा विचार महत्त्वाचा आहे. यावेळी मनोहर जोशी, अशोक मगदूम ,अशोक वरूटे, शहाजी धस्ते ,शकील मुल्ला रामचंद्र ठीकणे आदी उपस्थित होते
Tags
इचलकरंजी