रिक्षा व कॅबचालक ओला,उबर, रॅपीडो तसेच स्विगी, झोमॅटो,अमेझॉन बॉईज फूड डिलिव्हरी बंद १०० % यशस्वी.



 मोबाईल ॲप्लिकेशन ॲप कर्मचारी यांची पिळवणूक,तर ग्राहकांची लूट, केव्हा मिळेल यातून सूट; पुणेरी नागरिक


 प्रेस मीडिया लाईव्ह 
    अन्वरअली शेख

पुणे : . पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरातील भागात 
आज मोठ्या संख्येने रिक्षाचालक व कॅबचालक ओला,उबर बंद मध्ये तसेच स्विगी, झोमॅटो बॉईज फूड डिलिव्हरी बंद मध्ये सहभागी झाले. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांची जे या मोबाईल ॲपवर ट्रान्सपोर्टेशन आणि डिलिव्हरी साठी अवलंबून असतात त्यांची तारांबळ उडाली होती  तसेच या बंद चा आज शहरातील विविध  सेवांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला  दिवसभरात दिसून आलेले चित्र आम्ही आपणास मोबाईल एप्लीकेशन ॲप चे  स्क्रीन शॉट च्या माध्यमातून फोटो दाखवले आहेत.


एअरपोर्ट वर PMPML च्या बसेस बोलवाव्या लागल्या. तर ओला उबर वर फक्त कंपनीच्या मालकीच्या बसेस होत्या. फूड डिलिव्हरी वर सुद्धा फार फरक पडला. Instamart चे ऑपरेशन पूर्ण बंद होते. तसेच swiggy zomato वर तर KFC, BURGER KING , pizza hut सारख्या कंपन्यांना सुद्धा त्याचा मोठ्याप्रमाणात फटका बसला म्हणून डिलिव्हरी देखील बंद ठेवावी लागली. 

बंद पुकारणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी  जिल्हाधिकारी ज्योती कदम मॅडम यांची व संजीव भोर (उप प्रादेशिक परिवहन अधिकारी )यांची भेट घेतली. त्यांनी शहर पातळीवरील विषय,आणि प्रश्न सोडवण्यासाठी पुढील आठवड्यात सर्व पहा कंपन्या, कामगार संघटना व अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊ असे कळवले. व इतर राज्य पातळीवरील विषयांसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करू असे ही आश्वासन दिलेले आहे. तसेच संघटनेतर्फे, प्रशासन  अधिकाऱ्यांना इशारा देण्यात आला की येत्या काही दिवसात आमच्या मागण्यांवर निर्णय नाही घेतल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडावे लागेल.

उच्च मध्यवर्गीय जे या ॲप्स वर जास्त अवलंबून असतात त्यांनी दिवसभर ट्विटर वर रोष व्यक्त केला. आज दिवसभरात शहराच्या विविध भागात प्रेस मिळेल अनवर आली यांनी रिक्षा व कॅबचालकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता त्यांना मोबाईल ॲप्लिकेशन ॲप द्वारे सर्विसेस पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत आहे असे असे कर्मचारीवर्गांनी प्रतिक्रिया दिल्या, तर एकीकडे मोबाईल ॲप्लिकेशन ॲप द्वारे सर्विस घेणाऱ्या नागरिकांकडून संताप व रोष व्यक्त होत होता बंद आणि लूट यापासून केव्हा मिळणार सूट असे स्वर ऐकू येत होत आहे

Post a Comment

Previous Post Next Post