प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -दंडाची रक्कम कमी करून देतो असे सांगून तक्रार दाराकडुन 36 हजारांची लाच घेताना विज मंडळातील दोघांना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडून कारवाई केली.ही कारवाई इंचलकंरजी येथील विज मंडळाच्या कार्यालयात केली.अभियंता सुयोग दिनकर पाटणकर (सोमवार पेठ,पन्हाळा)आणि लोखपाल रविंद्र बापूसाहेब बिरनाळे (शिक्षक कॉलनी ,इंचलकंरजी )अशी या दोघांची नावे आहेत.
तक्रारदाराने स्वतःच्या इमारतीत औद्योगिक वीज घेतली होती.व्यवसाय बंद झाल्यावर ती एकाला भाड्याने दिली होती. सदर वीज मंडळाच्या विभागाने पहाणी करून परवाना न घेता वीज वापरल्या बद्दल एक लाख 22 हजार 678 रु.नोटीस बजावली होती.तेव्हा या दोन अधिकारी यांनी वीज बिल कमी करून देतो त्या साठी 41 हजारांची लाच मागून त्यात तडजोड करत 36 हजार रुपये देणयाचे .तक्रारदाराने लाचलुचपत पथकाकडे तक्रार दाखल केली.याची खात्री करून त्या ठिकाणी सापळा रचून या दोघांना लाच घेताना कारवाई करुन यांचे विरोधात इंचलकंरजी येथील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस उपअधीक्षक श्री.सरदार नाळे,पो.उपनि.संजीव बंबर्गेकर यांच्यासह त्यांच्या पथकाने केली आहे.
Tags
कोल्हापूर