प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी संभाजी चौगुले :
कोल्हापूर : दिनांक २४/१०/२०२३ रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मा.मालोजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली राजे फाऊंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली. समाजातील वंचित लोकांच्या समस्या, त्यांच्या अडचणी, तसेच गोरगरीब लोकांच्या मदतीसाठी, राजे फाऊंडेशन ची स्थापना करण्यात आली आहे.
राजे फाऊंडेशनच्या चिन्हांचे अनावरण मा.श्रीमंत. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष - मा.रियाज जैनापुरे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष - ओमकार हिरवे,पश्चिम महाराष्ट्र सचिव- रशिद सय्यद, जिल्हा अध्यक्ष- संग्राम पाटील,जिल्हा सचिव- उत्तम शेलार,कोल्हापूर शहर अध्यक्ष- नरेंद्र पोवार,कोल्हापूर शहर महिला अध्यक्षा- स्वरूपा खुरंदळे तसेच शाहू सेनेचे संस्थापक अध्यक्ष- शुभम शिरहट्टी आदी उपस्थित होते.
Tags
कोल्हापूर