सोनसाखळी चोरांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश




प्रेस मीडिया लाईव्ह
 
विशेष प्रतिनिधी सुनील पाटील

रसायनी पोलीस ठाणे गु.र.नं. 212/2023 भा.द.वि. कलम 392, 34 प्रमाणे हा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात फिर्यादी ह्या रस्त्याने जात असताना आरोपींनी पाठीमागून येवून तिच्या गळ्यातील सोन्याची चैन व सोन्याचे मन्यांची सर जबरीने खेचल्याने वरील गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेचे, पोनि / श्री. बाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरु असताना सदर गुन्ह्यात पोलीस हवालदार / संदीप पाटील स्थानिक गुन्हे शाखा यांना सदर आरोपी बाबत गोपनीय माहिती मिळाल्याने सपोनि / श्री. नागेश कदम व त्यांचे पथकाने आरोपीत नामे 1) आकाश ऊर्फ गड्डी दिपक इंदुलकर, वय - 24 वर्ष, रा. चांभारली, मोहपाडा, ता. खालापुर 2) इरशाद मोहम्मद अली शेख, वय 21 वर्ष, सध्या रा. वालधुनी, कल्याण, मुळ रा. नवीन पोसरी, मोहपाडा, ता, खालापुर यांना सदर गुन्ह्याचे कामी अतिशय शिताफीने ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा व इतर गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार / 1821 संदीप पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड हे करीत असुन आरोपीत यास मा. न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालय यांनी दि. 21/10/2023 रोजी पावेतो पोलीस कोठडी दिली आहे.

सदर आरोपीत यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून हस्तगत केलेला मुद्देमाल खालीलीप्रमाणे:-

(1) 56,000/- 15 ग्रॅम सोन्याची चैन 2) 7000/- 1.8 ग्रॅम वजनाचे 29 सोन्याचे मनी

3) 20,000/- 07 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप 4)35,000/- रोख रक्कम

1,18,000/- एकुण सोन्याचे दागिने व रोख रक्कम

*सदर आरोपीकडून उघड झालेले गुन्हे खालीलप्रमाणे:-

1) रसायनी पोलीस ठाणे गु.र.नं. 212/2023 भा.द.वि.क 392, 34 प्रमाणे

2) रसायनी पोलीस ठाणे गु.र.नं. 92/ 2023 भा.द.वि.क 457,454, 380 प्रमाणे (3) रसायनी पोलीस ठाणे गु.र.नं. 196/2023 भा.द.वि.क 380 प्रमाणे

सदरची कामगिरी मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक रायगड, मा. श्री. अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक रायगड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि / श्री. बाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि / श्री नागेश कदम, सफौ / श्री. प्रसाद पाटील, पोहवा/राजेश पाटील, पोहवा/ यशवंत झेमसे, पोहवा / संदीप पाटील, पोहवा / सुधीर मोरे, पोहवा / राकेश म्हात्रे यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post