तारदाळ येथील गटारी अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यचा प्रश्न. ..



प्रेस मीडिया लाईव्ह : 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत कांबळे

तारदाळ ता.हातकणंगले येथे बौद्ध वस्ती शेजारुन तारदाळ- इचलकरंजी रोड गेला असून सदर रस्त्याच्या कडेला गटार गेलेली आहे.  सदर गटारीची स्वच्छता न केल्यामुळे सदरचा परीसर घाणीच्या साम्राज्यचा व दुर्गंधीयुक्त बनला आहे साफसफाई अभावी  सगळी कडे कचराच कचरा झाला आहे त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांच्या आरोग्यचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे डेंग्यूची  साथ येऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्धभवू शकतो. घाणीमुळे भटक्या कुत्र्याचा वावर वाढत आहे एकीकडे शासन स्वच्छता अभियान राबवित असताना तारदाळ ग्रामपंचायतीच्या साफसफाई दुर्लक्षामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे  ग्रामस्थामधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे .

Post a Comment

Previous Post Next Post