इंजिनियर तरुणांची इराणी खणीत उडी मारून आत्महत्या.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - इंजिनिअरचे शिक्षण घेऊनही मना सारखी नोकरी मिळत नसल्यामुळे सभाजीनगर येथील शिवम अनिल सावंत (26) याने इराणी खणीत उडी मारून आत्महत्या केली.त्याच्या वडीलाच्या निधनानंतर त्याच्या आईने काबाडकष्ट करून स्वतःच्या हिमतीवर शिवमला इंजिनिअर केले होते.

सध्या खाजगी कंपनीत नोकरी करत होता.पण मना सारखी नसल्याने दुसररया नोकरीच्या शोधात होता.त्याला मनाप्रमाने नोकरी मिळत नसल्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.सोमवारी संध्याकाळी शिवम घरातुन बाहेर पडल्याने रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईक शोध घेत असताना मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह इराणी खणीत सापडला.या वेळी त्याच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता.या घटनेची नोंद पोलिसांत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post