बेमूदत साखळी ऊपोषणाचा दूसरा दिवस

 


प्रेस मीडिया लाईव्ह  : 

विशेष प्रतिनिधी सुनील पाटील

बुधवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ पासून मु. बोलें, सांगडे, बेलवली व पालीखुर्द ता.पनवेल येथिल शेतकरी व ग्रामस्थ बंधू-भगिनींचे मु.बोर्ले येथे टोलनाक्या लगत हॉटेल ओम साई मल्हार येथे मोकल्या जागेत  शेतकऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण  सुरू केले आहे .

 प्रमुख मागण्या

  १. विरार ते अलिबाग महामार्गात उध्वस्त होणारी मु. बोलें, सांगडे, बेलवली व पालीखुर्द हि गाव वाचविण्या बाबत.

२. विरार ते अलिबाग महामार्गात पनवेल तालुक्यातील घरे, गावे उध्वस्त होत असतील तर त्यांचे त्या त्या गावालगत पुनर्वसना बाबत, व त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक मागण्या व भूसंपादन जमिन २०१३ चा कायदया नुसार मिळणारे सर्व फायदे बाबत.

३. मौजे बोलें व सांगडे या गावांचे नैना / सिडकोने मूळगावठाणात परियोजना- ९ समाविष्ट केली आहे ती मागे घेऊन रद्द करणे बाबत.

४. गरजेपोटी बांधलेली मूळगावठाणा बाहेरील सर्व घरे नियमित करणे बाबत.

५. व इतर अनेक प्रश्नां संदर्भात.बेमुदत साखळी उपोषण सुरु

नैना प्रकल्प व कॉरिडॉर रस्ते बाधित शेतकरी ग्रामस्थ कृती समिती सांगडे, बोलें, बेलवली व पालीखुर्द नवी मुंबई ९५ गाव, नैना व इतर प्रकल्पग्रस्त समिती पनवेल, उरण



उपोषण कर्ते 

  1) बळीराम भोपी

2)पद्माकर म्हात्रे

3) अनंता भोपी

4) शांताराम पाटील


 पहील्या दिवसापेक्षा अधीक आज दुस-या दिवशी शेतकरी बंधु-भगिनी जास्त संखेने उपस्थित होत्या व वाढता प्रतीसाद  आज दिसून आला आहे.

 सुत्र संचालन श्री मच्छिंन्द्र पाटील  व प्रास्ताविक श्री सुरेश पवार यानी केले.श्री जे.आर .पाटील,श्री नारायण पाटील व बी.एम.पाटील यानी प्रकल्पग्रस्ताना मार्गंदर्शंन केले.

 या साखळी उपोषणास प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.दशरथ दादा पाटील(दि. बा.पाटील विमानतळ कृती समीती अध्यक्ष)ठाणे यांनी साखळी उपोषणास भेट देऊन पाठींबा देवून शेतक-याना मार्गंदर्शंन करून या महामार्गातून ही गावे वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करू व इतर प्रश्न सोडवणूक करण्याच  सुद्धा प्रयत्न करू. मा ॲड.सुरेश ठाकूर साहेब अध्यक्ष  नवी मुंबई 95 गाव ,नैना व इतर प्रकल्पग्रस्त समिती यानी ही या प्रकल्पग्रस्ताना खूप महत्वाच मार्गंदर्शंन केले.आ.बाळाराम पाटील यांनी ही पाठींबा दिला व मार्गंदर्शंन केले. 

मा.,श्री.जे.एम.म्हात्रे.साहेब यांनीही पाठींबा दिला , तसेच स्थानीक समाजसेवक बहूसंखेने येऊन पाठींबा  सहकार्य करून मार्गंदर्शंन करीत आहेत. जर मागण्या मान्य झाल्या नाहीतर बेमूदत आमरण उपोषण करुन तो अधीक तीव्र करण्यात आजचा दुस-या दिवसाचा साखळी उपोषणात महिलानी निर्धार केला.

 सदर उपोषण अॅड सुरेश ठाकूर साहेब  व सुरेश पवार  साहेब सागंडे यांच्या मार्गदर्शना खाली जगन पाटील,अनिल भोपी,गोंवीद पाटील, ग्राम पंचायत सदस्य घनश्याम पाटील, दिपक कांबळे,बळिराम पाटील, बालाराम पाटील, संदिप पाटील ,भाउराज पाटील गावातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून गेले तिन दिवस चालु आहे.

Post a Comment

Previous Post Next Post