मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
सोमवार दिनांक 02 ऑक्टोबर 2023 रोजी *शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख व उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी कार्यसम्राट आमदार श्री मनोहरशेठ भोईर* यांच्या नेतृत्वावर व कार्य प्रणालीवर विश्वास ठेवून बीजेपी चे सावळे गावाचे माजी सरपंच मा श्री शिवाजी माळी यांनी, मा उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कांता वसंत कांबळे, विद्यमान उपसरपंच प्रगती प्रभाकर जांभुळकर, सामाजिक कार्यकर्ते श्री योगेश कांबळे, श्री प्रभाकर जाभूळकर व श्री कमलाकर माळी यांनी आपल्या कुटुंबीयांसह शिवसेनेत प्रवेश केला, यावेळी मा *आमदार श्री मनोहरशेठ भोईर* यांनी सर्वांना भगवी शाल अर्पण करून व हाताला शिवबंधन बांधून सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले तसेच शिवसेना पक्षासाठी काम करून पक्ष वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे आशा शुभेच्छा दिल्या.