प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी सुनील पाटील
गटविकास अधिकारी पंचायत समिती खालापूर. यांना दिनांक ०३/१०/२०२३ रोजी सरपंचावर योग्य ती कायदेशीर कारवाही करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.
श्री. उमेश विठ्ठल साळवी रा. तुपगाव, पो. चौक, ता. खालापूर, जि. रायगड येथील कायमचा रहिवासी असून मी व आम्ही ग्रामस्थ मौजे तुपगाव ग्राम पंचायतीच्या मासिक सभेत शासन निर्णय अन्वये नेहमी बसत असतो.असेच दिनांक ३०/०९/२०२३ सकाळी ११.०० वाजताच्या मासिक सभेमध्ये मी बसलो असता माझ्या असे निदर्शन आले कि, मासिक सभेचे कामकाज हे नियमाप्रमाणे सुरु केले नाही. ग्राम सेवकांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले नाही, डायरेक्ट ग्रामस्यांच्या अर्जाचे वाचन चालू केले.त्यामुळे मी मा. सरपंच यांचे कडे हि बाब निदर्शनास आणून देण्यासाठी विनम्र परवानगी मागितली असता सरपंचानी मनात राग धरून सूड बुद्धीने मला दादागिरीने स्वःताची खुर्ची सोडून येऊन माझ्या खुर्चीजवळ येऊन हाताला व कॉलरला पकडून सभागृहाबाहेर घालवून सर्व सदस्य व ग्रामस्य यांच्या समोर मला अपमानाची वागणूक दिली.
सरपंच यांचे हे कृत्य अतिशय दादागिरीचे व निंदनीय आहे. सरपंच हा गावचा प्रथम नागरिक असतो. जर माहिती अधिकार संघटनेतील सभासदाशी सरपंच असा वागत असेल तर सामन्य नागरिकांची तो कशी वर्तणूक करीत असेल. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये व सदस्यामध्ये भय निर्माण झाले आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यलयात CCTV बसवणे बाबत पंचायत समिती खालापूर दिनांक २४/०८/२०२३ रोजी ग्रामपंचायत तुपगाव यांस पत्र आलेला आहे.तरी आपणांस मी संघटनेमार्फत विनंती करतो कि, आपण त्वरित या प्रकरणाची दखल घेऊन सरपंचावर योग्य ती कायदेशीर कारवाही करण्यात यावी असे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती खालापूर. यांना दिनांक ०३/१०/२०२३ देण्यात आले आहे.
श्री. उमेश विठ्ठल साळवी