प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी सुनील पाटील
रसायनि पोलीस स्टेशन व मोहपाडा येथील दुकानदार व् रिस पोलीस पाटील महेश जांभळे व त्यांचे पोलीस पाटील मित्र यांच्या सतर्क के मुळे महिलेस त्यांच्या राहत्य घरी सुखरूप पोहोच करण्यात आली
(एक मेसेज ) मोहोपाडा मार्केट मधील कपड्याचे दुकानदार हे एक महिला वेड्यासारखी मार्केट मध्ये भटकते आहे .असा मेसेज दिला.त्या महिलेस भेटून तिचा नाव,पत्ता विचारला व मिळालेल्या माहितीनुसार महिला नंदुरबार येथील असल्याचे समजले लगेच पोलिस पाटील संघटनेच्या अध्यक्ष सौ.दिपमाला पाटील मॅडम ह्यांच्याशी संपर्क साधला. व मिळालेल्या माहितीनुसार फुलसरे, कोकनीपाडा,सीकनी,डोंगरी पाडा येथील गावातील पोलिस पाटील ह्यांनी संपर्क साधून महिला हि फुलसरे गावातील आहे .हे समजले लगेच घरातील नातेवाईक ह्यांच्याशी संपर्क करून महिलेला घेवून जाण्याची विनंती केली .
पण सख्खा नातेवाईक नसल्यामुळे अडचण येत होती.ह्यामध्ये काही दिवस वाया गेले.दिनांक २५/९/२०२३ ला रीस हद्दीत एका महिलेचा अपघात झाला हे समजले लगेच पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला.व वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री.शत्रुघ्न माळी साहेब ह्यांच्या आदेशानुसार श्री.चौरे व श्री.गायकवाड साहेब ह्यांनी वेळ न घालवता अंब्युलेंशची सोय करून महिलेला M.G.M Hospital kalmboli ला दाखल केले. सदर महिलेच्या डोक्यास मार लागल्याने डोक्याची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. दोन दिवसांनी श्री.चौरे व श्री.पोलेकर साहेब आम्ही बघायला गेलो असता महिला व्यवस्थित असल्याचे चेक केले काहि दिवसांनी महिलेस जनरल वार्डला शिफ्ट झाल्यावर नातेवाईकांना माहिती दिली त्यानुसार नातेवाईक येवून महिलेस आपल्या गावास घेवून गेले. एका गरीब मातेस तिची मुलगी आपल्यामुळे भेटल्याचे समाधान वाटले