प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी सुनील पाटील
शेतकऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरूच तिसरा दिवस होऊन चौथा दिवस चालू असून शासनाला जाग येत नाही , बुधवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२३ पासून मु. बोलें, सांगडे, बेलवली व पालीखुर्द ता.पनवेल येथिल शेतकरी व ग्रामस्थ बंधू-भगिनींचे मु.बोर्ले येथे टोलनाक्या लगत हॉटेल ओम साई मल्हार येथे मोकल्या जागेत बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.
प्रमुख मागण्या १. विरार ते अलिबाग महामार्गात उध्वस्त होणारी मु. बोलें, सांगडे, बेलवली व पालीखुर्द हि गाव वाचविण्या बाबत.
२. विरार ते अलिबाग महामार्गात पनवेल तालुक्यातील घरे, गावे उध्वस्त होत असतील तर त्यांचे त्या त्या गावालगत पुनर्वसना बाबत, व त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक मागण्या व भूसंपादन जमिन २०१३ चा कायदया नुसार मिळणारे सर्व फायदे बाबत.
३. मौजे बोलें व सांगडे या गावांचे नैना / सिडकोने मूळगावठाणात परियोजना- ९ समाविष्ट केली आहे ती मागे घेऊन रद्द करणे बाबत.
४. गरजेपोटी बांधलेली मूळगावठाणा बाहेरील सर्व घरे नियमित करणे बाबत.
५. व इतर अनेक प्रश्नां संदर्भात.
बेमुदत साखळी उपोषण सुरु
नैना प्रकल्प व कॉरिडॉर रस्ते बाधित शेतकरी ग्रामस्थ कृती समिती सांगडे, बोलें, बेलवली व पालीखुर्द नवी मुंबई ९५ गाव, नैना व इतर प्रकल्पग्रस्त समिती पनवेल, उरण . काल ग्रामस्थांना भूषणच बसण्या संदर्भात केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आज आपल्या गावातील महिला भगिनींनी चांगला प्रतिसाद दिला .
सकाळपासून या सर्व महिला भगिनी रणरागिणी उपोषण मंडपात बसले आहेत यामध्ये पाटील सुजाता महेश पाटील आशा अनिल भोपी विमल जगन पाटील ज्योती दिलीप पाटील सुषमा अनंता भोपी हिरानानी अबुनानी शांतीबाई गोमा पाटील मंदाताई गायकवाड सोनम कैलास पाटील कमल अरुण पाटील रेवनाथ भोपी या आणि अनेक महिलांनी प्रतिसाद दिला त्यांचं खरोखर मनापासून कौतुक असाच प्रतिसाद गावातील सर्व ग्रामस्थांनी आम्हास द्यावं ही विनंती धन्यवाद