डॉ. तुषार निकाळजे यांची "संपादक" म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे:- ई. एस. एन. पब्लिकेशन( इंडिया) व लंडन ऑर्गनायझेशन ऑफ स्किल डेव्हलपमेंट (लंडन) या दोन संस्थांनी आयोजित केलेल्या" थिकेस्ट बुक इन द वर्ल्ड"  या जागतिक विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. जगातील हे सर्वात जास्त पृष्ठ असलेले पुस्तक आहे. यातील पृष्ठांची संख्या एक लाख  ५०० आहे. या उपक्रमात भारतातील एकूण  293 संपादक व लेखक म्हणून काम केले. या सर्व संपादक व लेखकांची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली  आहे.

 या सर्वांना गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित केले आहे. यामध्ये पुण्याचे डॉ. तुषार निकाळजे  यांचा समावेश आहे. डॉ. निकाळजे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेवानिवृत्त शिक्षकेतर- कर्मचारी . विद्यापीठात शिक्षकेतर- कर्मचारी म्हणून काम करीत असतानाच त्यांनी एम. फील,, पीएच. डी.शिक्षण पूर्ण केले , बारा पुस्तके लिहून प्रकाशित केली, 78 लेख प्रकाशित केले आहेत, पाच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग घेतला. डॉ. निकाळजे यांनी दृष्टीहीन व्यक्तींकरिता लिहिलेल्या "अंडरस्टँडिंग द युनिव्हर्सिटी" या ब्रेल इंग्रजी पुस्तकाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. त्यांनी नुकतीच "क्लर्क टू वर्ल्ड रेकॉर्ड"  या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. डॉ. निकाळजे यांची दोन पुस्तके सात विद्यापीठांच्या बी.ए व एम. ए. अभ्यासक्रमास संदर्भ पुस्तक म्हणून मान्यता मिळाली आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, तामिळनाडू, लंडन, अमेरिका इत्यादी 14 शैक्षणिक संस्थांनी डॉ. निकाळजे यांना शैक्षणिक पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले आहे. हा सर्व शैक्षणिक व संशोधनात्मक प्रवास डॉ. निकाळजे यांनी स्वखर्चाने केला आहे. 

                 याप्रसंगी डॉ. निकाळजे यांनी खंत व्यक्त केली. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकेतर-  कर्मचाऱ्यांना राज्यस्तरावर, केंद्रस्तरावर (विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली) कोणत्याही सुविधा- सवलती नाहीत. उदा. ए.पी.आय, करिअर ऍडव्हान्समेंट स्कीम, एफ.आय.पी.समक्ष इत्यादी. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता इतर क्षेत्राप्रमाणे राज्यस्तरावर व केंद्रीय स्तरावर कोणतेही प्रोत्साहन पर पुरस्कार-  पारितोषिक नाही. आता नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी चालू आहे. शिक्षण क्षेत्रातील शिक्षकेतर- कर्मचारी हा एक आधारस्तंभ व महत्त्वाचा दुवा आहे, याची दखल राज्य शासनाने व विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी गांभीर्याने घ्यावी.

Post a Comment

Previous Post Next Post