स्वच्छता पंधरवडा' निमित्त भारती विद्यापीठ आयएमईडी ची स्वच्छता मोहीम

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवडा - ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाअंतर्गत भारती विद्यापीठ इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट(आयएमईडी) तर्फे स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्वच्छता आणि श्रमदान करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील ,आय एम इ डी चे प्रभारी संचालक डॉ. अजित मोरे, पीसीपीचे  प्राचार्य  आत्माराम पवार, वाय. एम. कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे,  विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. उज्ज्वला बेंडाळे, आय एम इ डी चे उपप्राचार्य डॉ.रामचंद्र महाडिक तसेच  एरंडवणे कॅम्पसचे सर्व विभागप्रमुख,प्राध्यापक ,सेवक वर्ग,  विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

' भारती विद्यापीठाचे संस्थापक पतंगराव कदम, कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ .विश्वजीत कदम , कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांची प्रेरणा  तसेच भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशनच्या संचालक डॉ.अस्मिता जगताप यांचे  मार्गदर्शन   आयएमईडी ला लाभले. स्वच्छता आणि सेवेचे उपक्रम यापुढेही चालू राहतील', असे उद्गार आय एम ई डी चे प्रभारी संचालक डॉ.अजित मोरे यांनी यावेळी बोलताना काढले.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या स्वच्छता अभियानाबद्दल  भारती विद्यापीठाचे कौतुक केले. १ ऑक्टोबर २०२३ रोजी भिडे पुलाजवळील नदीपात्रात हा स्वच्छता,श्रमदान उपक्रम पार पडला. 




Post a Comment

Previous Post Next Post