प्रेस मीडिया लाईव्ह :
फिरोज मुल्ला सर :
पुणे.. सरकारी शाळा दत्तक देण्याचा निर्णय(जि.आर.) रद्द करावा याकरिता शिक्षण आयुक्त कार्यालयावर जनहितार्थ पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य सरकारचा जाहीर निषेध करून सर्वसामान्य नागरिकांच्या मुला मुलींना कंत्राटी पद्धतीने शिक्षण व्यवस्था निर्माण करून शिक्षणापासून वंचित ठेवण्याच्या अन्यायकारक वटहुकूमाच्या विरोधात तिव्र आंदोलन घेण्यात आले
या आंदोलनाला मार्गदर्शन संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मुल्ला (सर) यांनी केले आणि सांगितले कि मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना जर राज्यातील सरकारी शाळा चालवता येत नाही तर महाराष्ट्र राज्याचा पूर्ण कारभार कसा चालवणार हे सरकार चालविण्यासाठी व राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी सक्षम नाही यांनी ताबडतोब नैतिक जवाबदारी समजून राजीनामे द्यावे असी मागणी केली राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलन घेण्यात आले
हे आंदोलन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत मुळे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले यावेळी प्रदेश संपर्क प्रमुख सुंदर नाना मिसाळे, प्रदेश महिला कार्यध्यक्षा सिंधुताई तुळवे, प्रदेश महिला संघटक ज्योतीताई झरेकर, प्रदेश महिला सचिव मंगलताई सोनवणे, पुणे महिला संपर्क प्रमुख विजयाताई खटाळ, पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा शुभांगी शिंदे, पुणे शहरध्यक्ष रमाकांत शर्मा, पुणे शहरकार्यध्यक्ष बाळासाहेब ढावरे,पुणे जिल्हा संपर्क प्रमुख संजय मडपे,पुणे शहर उपाध्यक्ष लक्ष्मिकांत कुंबळे,जुल्फिकार बिद्री,युसुफ बागवान,आसलम बागवान, हानीफ शेख,चाँदभाई बलबट्टी,राकेश पिल्ले,हाडपसर म संघाचे अध्यक्ष गोविंद कसबे, हावेली ता अध्यक्ष परमेश्वर कसबे,जेष्ठ नागरिक आशोक शिंदे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते