विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून शुभेछ्या देण्यात आल्या
प्रेस मीडिया लाईव्ह :
अली सय्यद : विशेष क्रिडा प्रतिनिधी :
पुणे : अरुण कुमार वैद्य स्टेडियम येथे झालेल्या कराटे स्पर्धा मध्ये अप्पर बिबवेवाडी येथील श्री रामराज्य माध्यमिक विद्यालय मधील मुला मुलांनी इंटर स्कूल कराटे स्पर्धे मध्ये घवघवीत यश मिळवून दुसरा क्रमांक पटकावला.
सर्व यशस्वी झालेल्या स्पर्धकांना क्रिडा शिक्षक श्री. शिंदे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री विजयराव मोहिते व सचिव श्री सुहास पांगुळ साहेब , तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेन्द्र आरसूळ यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेचे आयोजन अली सय्यद यांनी केले
Tags
पुणे