मिसाईल मँन माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए.पि.जे.आब्दुल कलामांचा विसर देशाला पडू नये-- डॉ. श्रीपाल सबनीस



प्रेस मीडिया लाईव्ह : 

फिरोज मुल्ला सर  : 

पुणे : पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने डॉ. ए.पि.जे.आब्दुल कलाम यांची जयंती एसेम जोशी सभागृहात साजरी करण्यात आली हा कार्यक्रम संघटनेचे प्रमुख फिरोज मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला . 

 या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेष्ठ विचारवंत डॉ  श्रीपाल सबनीस जनतेला संबोधित करत असताना ते म्हणाले कलामांनी अनेक अग्नी बाणाची निर्मिती केली पोखरणची अणु चाचणी फार गुप्तपणे केली माजी प्रधानमंत्री आटलबिहारी वाजपेयींचा कला मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . 



ही  व्यक्ती अत्यंत राष्ट्रभक्त देशाच्या मातीशी संस्कृतीसी एकनिष्ठ असनारे मुसलमान शास्त्रज्ञ होते परंतु देशामध्ये मुस्लिम समाजाबद्दल स्वंसयाची भूमिका रूजवली जात आहे प्रत्येक मुसलमान राष्ट्र विरोधी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे हे र्दुदैव आहे खर म्हणजे राष्ट्रप्रेम करणारी मुस्लिम समाजाची मोठी परंपरा आहे आशपाकउल्ला खान ते कुर्बान हुसेन पर्यंत आणि एक हिंदु शास्त्रज्ञ नुरूल सारखा देशासी गद्दारी करतो आणि मुस्लिम शास्त्रज्ञ आब्दुल कलामा सारखी लोक राष्ट्रभक्त होतात हे अत्यंत महत्त्वाचे आहे राष्ट्रपतीच्या निवडनूकीत आटलबिहारी वाजपेयी आणि सोनिया गांधी यांनी आब्दुल कलामांच्या राष्ट्रभक्तीच्या भूमिकेवर विज्ञान प्रेम जनतेचे प्रेम पाहुन त्यांच्यावर विश्वास टाकला आणि बिनविरोध त्यांची राष्ट्रपती म्हणून निवड केली देशाच्या आतापर्यंतच्या राष्ट्रपती मध्ये सर्वांची कामामध्ये वाद विवाद कमी जास्त झाली परंतु कलामांच्या संदर्भात मात्र तस झालं नाही मुस्लिम जरी असले तरी उदारमतवादी सर्वधर्मसमभाव भावना ठेवणारे होते कर्मठ जातीवाद कधीही मान्य होणार नाही संविधानाने सर्व धर्माला स्वतंत्र दिल आहे राष्ट्र प्रेम जपण हे कलामांचे गुण होते  इस्लामचे राष्ट्रीय एकतेचे प्रतिक जर ए.पि.जे आब्दुल कलाम आहेत मौलाना आजाद असतील शहीद आब्दुल हामीद असतील तर इस्लामचे संस्कार वाईट नाही इस्लाम मानवतेचा संदेश देता आपण आपली बगण्याची  दृष्टी बदलली पाहिजे कलाम साहेब निवृत्तीनंतर राष्ट्रपती भवनातून बाहेर पडत असताना त्यांच्या हातात फक्त दोन जून्या बँग होत्या  चार शर्ट सहा प्यांटा तीन सुट आडीज हाजार पुस्तके भारतरत्न पदमभूषण पदमश्री सोहळा  डॉक्टरेट 114सुविचार त्यांच्या एकच फ्लॅट होता तोही संसोधन करण्यासाठी भेट दिला पेन्शन गावातील शाळेला दान दिली ते मिसाईल मँन कलावंत राष्ट्रपती असे कलामांच्या भूमिकेत अनेक कला होते असे ग्रेटमँन कलाम होते अशी महत्त्वाचा इतिहास सांगून जनतेला संबोधित केले . 

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डी वाय पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विद्यानंद मानकर,संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष आठवले रमाबाई पुत्र विठ्ठल गायकवाड,युवा नेते प्रमोद दिवेकर,पुणे मीडिया लाव्हचे संपादक महेबुब सरजेखान, जनशक्ती विकास संघटनेचे अध्यक्ष आसिफभाई खान हालिमाताई शेख आदी मान्यवर उपस्थित होते. 

 हा कार्यक्रम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत मुळे यांनी केले तसेच ए.पि.जे.आब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले गौसिया खान,निलिमा गायकवाड, लेपटनंट डॉ. यासीन शेख,सतिश दादा भांगर,पत्रकार वसंत रांधवण, रहिमभाई सय्यद, प्रेस मीडिया लाईव्ह चे क्रीडा  पत्रकार अली सय्यद आदी मान्यवरांना डॉ. श्रिपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. 

 यावेळी कार्यक्रमाला महिला कार्याध्यक्षा सिंधुताई तुळवे, महिला प्रदेश संघटिका ज्योतीताई झरेकर, पुणे शहर अध्यक्ष रमाकांत शर्मा, पुणे शहर उपाध्यक्ष लक्ष्मिकांत कुंबळे,पुणे शहर संपर्क प्रमुख संदिपभाऊ शेंडगे,पुणे जिल्हा महिला संपर्क प्रमुख विजयाताई खटाळ,पिंपरी चिंचवड महिला शहर अध्यक्षा शुभांगीताई शिंदे,पुणे शहर युवक अध्यक्ष ऐमान शेख आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चांदभाई बलबट्टी यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post