२९व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात साकारणार १० सिने अभिनेत्रींचा नृत्याविष्कार



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : २९ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचा यंदाचा उद्घाटन सोहळा  घटस्थापनेच्या दिवशी  रविवार  दि. १५  ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न होत असून या उद्घाटन सोहळ्यात ख्यातनाम अभिनेत्री अमृता धोंगडे, हेमांगी कवी, भार्गवी चिरमुले, सानिया चौधरी, अदिती द्रविड, ऋजुता सोमण, कार्तिकी आदमाने, वैशाली जाधव, श्वेता परदेशी आणि सायली पराडकर या सिने अभिनेत्रींची उपस्थिती विशेष आकर्षण असेल.

तसेच या उद्घाटन सोहळ्यातील सांकृतिक कार्यक्रमात या सर्व सिनेतारका ‘महाराष्ट्राच्या महानायिका’हा विशेष नृत्यांचा कार्यक्रम सादर करून गानकोकिळा आशा भोसले यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गाण्यांवर नेत्रदीपक नृत्यविष्कार सादर करणार आहेत. ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शिका निकिता मोघे यांनी याचे नृत्य दिग्दर्शन केले असून ‘पायलवृंद’ या त्यांच्या संस्थे मार्फत हा कार्यक्रम सादर होईल. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या या १० सिनेतारकांनी पुण्यात एकत्र एका मंचावर नृत्यविष्कार सादर करण्याची ही पहिलीच वेळ असेल असे पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सांगितले. 



Post a Comment

Previous Post Next Post