प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची हैद्राबाद येथे संपन्न झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतील निर्देशानुसार आज काँग्रेस भवन, पुणे येथे पश्चिम महाराष्ट् विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीस प्रातांध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले, माजी केंद्रीय मंत्री मा. सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष मा. बसवराज पाटील मुरूमकर, मा. आ. प्रणितीताई शिंदे, मा. आ. डॉ. विश्वजीत कदम, मा. आ. संग्राम थोपटे, प्रदेश महिला अध्यक्षा मा. संध्याताई सव्वालाखे आदींच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीची सुरूवात ‘काँग्रेस पक्षाचा इतिहास’ व ‘भारत जोडा’ यात्रेच्या छायाचित्र प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आली. या छायाचित्र प्रदर्शनाचे संयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांनी केले होते आणि पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीचे संपूर्ण नियोजन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले होते.
प्रांताध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांनी पत्रकार परिषदे दरम्यान या बैठकीविषयी माहिती दिली. संपूर्ण राज्यात विभागीय बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहे. या बैठकांमधून काँग्रेस पक्ष संघटनात्मक मजबुतीने लोकांपर्यंत पोहचला पाहिजे यासाठी नियोजन करण्यात येणार आहे आणि सध्याच्या अत्याचारी सरकारचा खरा चेहरा लोकांपुढे आणणार आहे. शेतकऱ्यांवरील अन्याय, महागाई, बेरोजगारी, गरीबांवरील अन्याय यासाठी चळवळ उभी करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या कथनी व करणीतील फरक जनतेच्या निर्देशनास आणणार आहे. राज्यातील हे सरकार शेतकरी, गरीब जनता, तरूण, बेरोजगार यांच्या विरोधातील आहे. हे सेल्फीश सरकार आहे. सुप्रिम कोर्टानेही सरकारचा खरा चेहरा उघडा केला आहे. काही भागात ओला दुष्काळ तर काही भागात कोरडा दुष्काळ असूनही हे सरकार दुष्काळ जाहिर करत नाही.
नांदेड व ठाणे येथील सरकारी रूग्णालयातील मृत्यूचे तांडव पाहूणही सरकारला जाग येत नाही. दोन्ही उपमुख्यमंत्राचा डोळा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर आहे.
काँग्रेस जनतेसाठी लढत आहे. शाहू - फुले - आंबेडकर विचारांना वाचविण्याचे काम तसेच भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांनीही एकजूटीने काम करावे. या बैठकीमध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण, कोल्हापूर शहर, कोल्हापूर ग्रामीण, सांगली शहर, सांगली ग्रामीण, सातारा, सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण व पिंपरी चिंचवड शहर आदी जिल्हांचा आढावा घेऊन बुथ कमिट्या, ब्लॉक कार्यकारिणी व संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्ह्याचे प्रभारी/सहप्रभारी, प्रदेश पदाधिकारी, आजी माजी आमदार, ब्लॉक अध्यक्ष, आघाडी संघटना, विभाग व सेल अध्यक्ष, बुथ कमिटी सदस्य आदी उपस्थित होते.