प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान कराटे ट्रेनिंग सेंटर महात्मा गांधी जयंती निमित्त अरुण कुमार वैद्य स्टेडियम, बॉक्सिंग हॉल, भवानी पेठ, येथे दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी कराटे स्पर्धा संपन्न झाल्या , या स्पर्धा मध्ये असंख्य म मुलींनी व मुलांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे आयोजन कराटे कोच अली सय्यद सर यांनी केले .
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. रमेश बागवे ( माजी ग्रहराज्य मंत्री ) व युवा नेते मा.अविनाश बागवे होते . रमेश बागवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की कराटे कोच अली सय्यद सर यांच्या कार्याचे कौतुक करून मी नेहमी त्यांच्या सोबत असेन असे आश्वासन दिले . युवा नेते अविनाश बागवे यांनी सुद्धा अली सय्यद यांच्या पाटीवर कौतुकाची थाप मारून शुभेच्छा दिल्या .
प्रमुख उपस्थिती म्हणून प्रेस मीडिया लाईव्ह चे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान , ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद जावेद मौला, महाज टाईम्स चे संपादक मूनाफ शेख , मेरा भारत टाईम्स चे उस्मान कादरी होते.
सुरवातीस प्रमुख पाहुणे , रमेश दादा बागवे , अविनाश बागवे यांचा सन्मान करण्यात आला , तर उपस्थित पाहुण्यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला . विजेत्या स्पर्धकांना प्रेस मीडिया लाईव्ह चे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान , महाज टाईम्स चे संपादक मूनाफ शेख , ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद जावेद मौला, यांचे हस्ते विजेते स्पर्धकांना येलो बेल्ट देण्यात आला.
प्रथम क्रमांक मिळालेल्या खेळाडूंचा सत्कार
आमचे सर्व खेळाडूंना प्रथम क्रमांक फर्स्ट ट्रॉफी मिळाल्याबदल. प्रमुख पाहुणे रमेश दादा बागवे (माजी गृहराज्य मंत्री) अविनाशजी बागवे (नगरसेवक ) यांच्या हस्ते फर्स्ट ट्रॉफी पुरस्कार देऊन व मान सम्मान करून सर्व कराटे विद्यार्थिना अभिनंदन करण्यात आले.
द्वितीय क्रमांक मिळालेल्या खेळाडूंचा सत्कार
अप्पर कराटे क्लब च्या कराटे कोच अंकुश शिंदे सर यांच्या कराटे चे सर्व खेळाडूंनी द्वितीय क्रमांक सेकंड ट्रॉफी मिळाल्याबदल. प्रमुख पाहुणे रमेश दादा बागवे (माजी गृहराज्य मंत्री) अविनाशजी बागवे ( नगरसेवक ) यांच्या हस्ते सेकंड ट्रॉफी पुरस्कार देऊन व मान सम्मान करून सर्व कराटे विद्यार्थिना अभिनंदन करण्यात आले.
तिसरा क्रमांक मिळालेल्या खेळाडूंचा सत्कार
तड़जाई कराटे क्लबचे कराटे कोच मोहित सेटिया सरव त्यांच्या सर्व खेळाडूंचा तीसरा क्रमांक मिळाल्याबदल ट्रॉफी पुरस्कार देऊन व मान सम्मान करून सर्व कराटे विद्यार्थिना अभिनंदन करण्यात आले.