प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : मा. गोपाल इटालिया साहेब महाराष्ट्र राज्य उपप्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात जनशक्ती अभियान राबविण्यात येत आहे .जनशक्ती अभियान प्रारंभ लोकांच्या प्रश्नांची जाण करून घेण्यासाठी , तसेच लोकांचे प्रश्न हाताळण्यासाठी व पक्षाची ध्येय धोरण समजावून सांगण्यासाठी सुरू करण्यात आले आहे .
सदरील अभियान पूर्ण पुणे शहरांमध्ये गल्लोगल्ली घरोघरी पोहोचण्याचा संकल्प पुणे शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी केला आहे सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करताना ते असे म्हणाले प्रत्येक घराघरांमध्ये प्रत्येक महिलेला , पुरुषाला , लहान मुले , सगळ्यांना दिल्ली सरकार व पंजाब सरकार मध्ये मिळणारे योजनांच्या पूर्ण माहिती देण्यात येईल तसेच , आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये देखील या योजना ( सवलती ) मिळू शकतात . लोकांचे भले करण्याची इच्छा असलेले सरकार सत्तेत आणावे लागेल म्हणूनच आम आदमी पक्षाला दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही , असे यावेळी सुदर्शन जगदाळे यांनी सांगितले .जनशक्ती अभियान अंतर्गत नागरिकांशी संवाद, जंगली महाराज रस्ता, छत्रपती शिवाजी नगर पुणे .
यावेळी पुणे शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे*, मुकुंद किर्दत, प्रशांत कांबळे, अक्षय शिंदे, सतीश यादव, अमोल मोरे, निलेश वांजळे, अनिल कोंढाळकर, अमित म्हस्के, आप्पा कोंढाळकर, सय्यद अली, शितल मॅडम, माधुरी गायकवाड, सुरेखा भोसले, अनिल धुमाळ, आरती करंजवणे, संदेश दिवेकर, किरण कांबळे, स्वप्निल गोरे, प्रीतम कोंढाळकर, शिवाजी डोलारे, संजय कटारनवरे, अभिजीत गायकवाड, कुणाल धनवडे, रवींद्र पाडळे, सेंथिल अय्यर, विक्रम गायकवाड, अनिकेत सोनवणे, मनोज एरंडकर आदी सहकारी उपस्थित होते.