प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे- येरवडा विश्रांतवाडी पोलीस स्टेशन च्या अंतर्गत येणाऱ्या सर्व भागांतील नागरिकांना गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करता यावा यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी कसरत करत, फौजफाटा लावत चोवीस तास सुरक्षा व्यवस्था दिल्याबद्दल आम आदमी पार्टी तर्फे विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मा.भालचंद्र ढवळे व शास्त्री नगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मा.रवींद्र कुमार वारगुंडे साहेबांना शाल पुष्पगुच्छ देऊन पोलीस प्रशासनाचे आभार मानले
यावेळी पोलीस प्रशासनाचे सर्व पदाधिकारी पोलीस अंमलदार मा. देविदास वंढारे, अंमलदार मा. साईनाथ मस्के, पोलीस मित्र फय्याज शेख, पोलीस निरीक्षक मा सत्यवान गेन उपस्थित होते.
या सत्कार प्रसंगी आम आदमी पक्षाचे पुणे शहर युवक आघाडीचे अध्यक्ष मा.अमित म्हस्के, पुणे शहर संघठण सहमंत्री मा.मनोज शेट्टी, विजय लोखंडे, मयुर कांबळे, प्रताप म्हस्के, नितेश विश्वकर्मा, चेतन बेळमकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते