प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासन इमारतीच्या तळमजल्यावर कुलसचिव कार्यालय तथा अपिलीय अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांकाचा बोर्ड लावला आहे. या बोर्डचे बारकाईने निरीक्षण केल्यास याचे दूरध्वनी क्रमांक चुकीचे असल्याचे निदर्शनास येईल. हे दूरध्वनी क्रमांक तीन ते चार वर्षांपूर्वीच बदलले आहेत . या प्रशासकीय इमारतीमध्ये कुलसचिव, वरिष्ठ कायदा अधिकारी, उपकुलसचिव, प्रशासन ही प्रमुख कार्यालये आहेत.
या बोर्ड शेजारी लिफ्ट आहे. या इमारती मधील वरील सर्व अधिकारी व ४५ कर्मचारी रोज ये- जा करीत असतात. तसेच कुलसचिव महोदयांची चार चाकी गाडी देखील येथे पार्क केलेली असते. गेल्या पाच वर्षात हे प्रत्येक जण एकूण ५७७६ वेळा ये- जा करीत आहेत. परंतु या एकाच्याही अद्याप लक्षात आलेले नाही की कुलसचिव तथा अपिलीय अधिकारी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक चुकीचा आहे.ही बाब माहिती अधिकाऱ्यांनी देखील निदर्शनास आणलेले नाही. कुलसचिव महोदय हे माहिती अधिकाराचे अपिलीय अधिकारी आहेत. माहिती अधिकार म्हटला की विद्यापीठाची इत्यंभूत माहिती असणे अपेक्षित आहे. परंतु या कुलसचिवांना स्वतःच्याच कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक माहीत नसल्याचे जाणवते. मग या कुलसचिव महोदयांचे लक्ष कोठे आहे? असा प्रश्न उद्भवतो.