प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : शिक्षण हक्क बचाव कृती समिती पुणे जिल्हा, पुणे शहर जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी( टीडीएफ )व माध्यमिक शिक्षक संघ तसेच जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संघटनांनी शासनाच्या अन्यायकारक धोरणाच्या विरोधात आज १३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व आयुक्त कार्यालय असा विराट मोर्चा काढला . शनिवारवाड्यापासून निघालेल्या या मोर्चाला जिल्ह्यातून पाच हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले.आरक्षण संपविणारा कंत्राटीकरणाचा आदेश मागे घ्यावा,६५ हजार सरकारी शाळांचे खासगीकरण,१४ हजारहुन शाळा बंद करू पाहणारी समूह शाळा योजना अशा अनेक अन्यायकारक धोरणांविरोधात आवाज उठविण्यात आला.
नियोजन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर, कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार, कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर ,शिक्षक आमदार जयंत आसगावकर , माजी आमदार मोहन जोशी, नाशिक विभाग पदवीधर संघाचे माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, माजी आमदार गव्हाणे , माजी आमदार सूर्यकांत पलांडे, राज्य टीडीएफ चे विश्वस्त के.एस. ढोमसे, महाराष्ट्र कॉस्मोपोलिटीन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार,कार्याध्यक्ष जी. के.थोरात,शहर मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य शिवाजीराव कामथे, जिल्ह्याचे अध्यक्ष वसंतराव ताकवले, सचिव पंकज घोलप, समन्वय समितीचे समन्वयक शिवाजीराव खांडेकर, अध्यक्षा स्वाती उपार ,जिल्हाध्यक्ष मुरलीधर मांजरे कार्याध्यक्ष तानाजी झेंडे , शरदचंद्र धारूरकर, विजयराव कोलते , शरद जावडेकर,हरिश्चंद्र गायकवाड, सुजित जगताप, .नंदकुमार सागर, प्रा.शशिकांत शिंदे, प्राचार्य राज मुजावर, विजयराव कचरे, सचिन दुर्गाडे, प्रसन्न कोतुळकर,अशोक धालगडे,अरविंद मोडक ,संतराम इंदुरे, दीपक खैरे, हर्षा पिसाळ , मुख्या.मधुरा चौधरी,भगवान पांडेकर,धोंडीबा तरटे, सुनील गिरमे,द्वारकानाथ दहिफळे,बाळासाहेब ईमडे ,मेधा सिन्नरकर डॉ. मंगल शिंदे, डॉ.उज्वला हातागळे, भारती राऊत,संजय सोनवणे,संजय ढवळे सहभागी झाले.
मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयावर होऊन अनेक मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य शिवाजीराव कामथे यांनी सर्वांचे आभार मानून व शासकीय आदेशांची होळी करून कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शिक्षण आयुक्त त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 200 शिक्षक बंधू-भगिनींसह या मोर्चामध्ये सहभागी झाल्या . तसेच सारथी शिक्षण संस्थेच्या सचिव सौ. मधुरा चौधरी ,लक्ष्मणराव आपटे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सिन्नरकर तसेच पुणे शहरातील विविध शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आपण सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी होऊन हा मोर्चा यशस्वी केला.
महात्मा फुले यांच्या वेशामध्ये आलेले सचिन दुर्गाडे अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल चे वेगवेगळ्या महापुरुषांच्या वेशामध्ये केलेली वेशभूषांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले..