प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे ः सध्या देशभरात विचारांचे विद्रुपीकरण करण्याचे काम सुरु आहे. सत्याचे विचार दाबण्याचे काम मोदी सरकारकडून सुरु आहे. पंतप्रधान मोदी आपला चेहरा देशभरात व्यापण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यांचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. महात्मा गांधींनी शेवटच्या घटकापर्यंत विकास होण्यासाठी प्रयत्न केला. महात्मा हेच खरे देशाचे नायक असून त्यांचे विचाराच देशाला वाचवू शकतात, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त महात्मा गांधी यांच्या जीववनार आधारित सुमारे 100 दूर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन बाळासाहेब ठाकरे कलादालनात भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उदघाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री रमेश बागवे, माजी नगरसेवक दत्ता बहिरट, लता राजगुरु, कमलताई व्यवहारे, सर्व ब्लॉक अध्यक्षासह आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ. सबनीस म्हणाले, सध्या अनेकांच्या डोळ्यावर झापडे आली आहेत. संभ्रतीत काही लोकांची झालेली आहे. अनेकांची निष्ठा पातळ झालेली आहे. त्या निष्ठा झागेवर याव्यात, गांधीप्रेम, लोकशाही जपण्यासाठी या उद्देशाने गांधींचे विचार पोहचविण्यासाठी अॅड. अभय छाजेड हे सातत्याने गांधीवरील जीवन कार्याचे प्रदर्शन भरवित आहेत.
जगाला प्रेरीत करणारे गांधी एका देशाचे नसून ते जगभराचे नायक आहे. स्वातंत्र्याबरोबरच त्यांनी विश्वशांतीचादेखील संदेश दिला आहे. विश्वाच्या कल्याणाचा ध्यास त्यांच्या विचारात होता. हाच विचार आपल्याला तारु शकतो. महात्मा गांधीचा लढा श्रमाला ताकत देणारा होता. त्यांनी देशाच्या कल्याणासाठी वस्त्र सोडून पंचा नेसला. महात्मा गांधी सत्याग्रहाने लढले. मात्र आज त्यांच्या विचारा गोळ्या घालण्याचे काम सुरु आहे. काहीजण त्यांच्या स्मृतीस्थळाला गोळ्य ा घालत आहे. त्यांचे विचार हे लोक कधीही संपवू शकत नाही. पंतप्रधान मोदी त्यांचेच विचाराने पुढे जात आहे. मात्र ते वेगळ्या पद्धतीने सांगत आहे. जगात फिरताना महात्मा गांधीचेच नाव त्यांना घ्यावे लागते. मात्र देशात गांधीचे नाव दाबण्याचे काम त्यांच्या हातून होत असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.
महात्मा गांधी यांचे योगदान देश कधीही विसणार नाही. अखंड भारतासाठी गांधीचा हा मुळ ध्येयवाद होता. गांधीचा इतिहास कोणीही वाचला नाही. त्यांचे विचार, साहित्य वाचावे, असेही यावेळी डॉ. सबनिस यांनी सांगितले.
अरविंद शिंदे म्हणाले, महात्मा गांधी यांनी केवळ स्वातंत्र्यासाठीचे नव्हे तर कुष्ठ रोगी, अस्पृश्यतेसाठी त्यांनी सामाजिक लढा उभा केला होता. महात्मा गांधींनी आपले आयुष्य कसे जगले हे आपण त्यांचे विचार वाचले पाहिजे. दीडशे वर्षे झाले तरी त्यांचे विचाराला कोणी मारु शकत नाही. गांधीजी मारण्यासाठी सध्या अनेकजण त्यांच्या विचारावर प्रहार करण्याचे काम सुरु आहे. गांधीचे विचार हे कधीही संपवू शकणार नाही. महात्मा गांधींचे साहित्य आपण आपण वाचले पाहिजे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
रमेश बागवे म्हणाले, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या दूर्मीळ चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. या प्रदर्शनातून त्यांच्या त्यागाचे दर्शन होते. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य देशासाठी वाहून घेतले होते. गांधींचा विचारानेच आपणाला चालावे लागणार आहे, असेही यावेळी त्यांनी नमूद केले.
अॅड अभय छाजेड यांनी प्रस्ताविक केले. ते म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या जीवन कार्यावरील चित्रप्रदर्शन भरविण्यात येते. लोकशाही जीवंत ठेवण्याचे कार्य या महान नेत्यांनी केले आहे. त्यांचे विचार सातत्याने तेवत ठेवण्यासाठी हे प्रदर्शन भरविण्यात येते. सध्या गांधी विचार दाबण्याचे षढयंत्र सुरु आहे. त्यांचे विचार कधी संपू देणार नाही. त्यांचे विचार पेरण्याचे काम आमच्याकडून सुरुच राहील, असेही यावेळी अॅड. छाजेड यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार निता राजपूत यांनी केले.