जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा सामाजिक उपक्रम
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी सुनील पाटील
पनवेल : नवरात्रीनिमित्त विविध मंडळां मार्फत नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येते. जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत यावर्षी श्रीक्षेत्र पंचायत मंदिर नढाळ,चौक येथे नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी संस्थेच्या माध्यमातून पनवेल परिसरातील महिलांसाठी जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि दिपक क्लिनिकल लॅब्रोटरी यांच्या संयुक्त विद्यमाने
"महिलांसाठी मोफत थायरॉईड टेस्ट"चे आयोजन 15 ऑक्टोबर 2023 ते 23 ऑक्टोबर 2023 या नऊ दिवसात सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था सेवालय, दिपक क्लिनिकल लॅबोरेटरी, शॉप नंबर 4 , वास्तु श्री सोसायटी, आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय पनवेल समोर,पनवेल येथे आयोजित केले आहे. यावेळी तपासणी करणाऱ्या सर्व महिलांना विरोधी पक्ष नेते श्री.प्रितम जे. म्हात्रे अध्यक्ष असलेल्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून एक *"सेवाकार्ड"* भेट म्हणून देण्यात येणार आहे त्यामध्ये
© 50% टक्यांपर्यंत सवलतीच्या दरात रक्ततपासणी
© उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल निराधार गरजू रुग्णांना मोफत फळ सेवा
© माफक दरात एक्स-रे, O.P.G., E.C.G. सेवा
© मोफत E-श्रम कार्ड नोंदणी
© विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन
© "ना नफा,ना तोटा" तत्त्वावर रुग्णवाहिका सेवा या सेवेचा लाभ महिला आणि त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य घेऊ शकतात अशी माहिती दिली श्री. प्रितम म्हात्रे यांनी दिली.
सदर तपासणी करीता अधिक माहितीसाठी आपण आमच्या हेल्पलाइन क्रमांक
8542050505 /
9326050505 /
7769050505 /
8334050505 या वर संपर्क साधावा
कट
आमच्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे आम्ही महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने नऊ दिवस हा "आरोग्य उत्सव" साजरा करत आहोत. मा.नगराध्यक्ष श्री जे एम म्हात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांचे नियोजन करत असतो.सामाजिक क्षेत्रात काम करत असताना 80% समाजकारण आणि 20% राजकारण या त्यांच्या शिकवणीमुळे आमच्या संस्थेचे सर्व सभासद नेहमीच आरोग्य,शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असतात. हा नवरात्रीचा आरोग्य उत्सव सुद्धा त्याचाच एक भाग आहे:-
श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे, अध्यक्ष जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था, मा. विरोधी पक्षनेते प.म.पा.