प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकणंगले येथे राजश्री शाहू आघाडी व शाहू फाउंडेशन मार्फत आघाडीचे धडाडीचे शिलेदार श्री अनिल चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुकडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री शशिकांत पाटील सर यांनी केले.
यावेळी प्रथमतः माननीय श्री अनिल चौगुले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व आघाडीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अतिग्रे येतील श्री भरत शिंदे यांची नुकतीच महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तसंस्था प्रेस मीडिया लाईव्ह मध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार लोकनियुक्त सरपंच श्री सुशांत वड्ड यांनी केला व अतिग्रे येथील माजी सरपंच व धडाडीचे शिक्षक श्री प्रशांत गुरव सर यांची खाजगी प्राथमिक शाळा संस्थेच्या इचलकरंजी शहर उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री दीपक पाटील यांनी केला तसेच शाहू आघाडीचे प्रमुख शिलेदार व शिक्षक श्री सचिन पाटील सर यांची सुजित मिणचेकर फाउंडेशन चा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार ग्रामपंचायत विद्यमान सदस्य श्री भगवान पाटील यांनी केला आघाडीच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांनी सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या
यावेळी उपस्थित लोकनियुक्त सरपंच श्री सुशांत वड्ड, सदस्य भगवान पाटील ,तंटामुक्त अध्यक्ष दीपक पाटील ,रुकडी केंद्रप्रमुख शशिकांत पाटील सर ,ग्रामविकास अधिकारी अशोक मुसळे साहेब ,प्रदीप पाटील ,उद्योजक अजित पाटील ,निवास पाटील ,सचिन पाटील ,प्रशांत गुरव ,अमर पाटील ,भाजपचे शहराध्यक्ष विश्वास पाटील ,कृष्णात पाटील ,अनिल चौगुले, दादासो पाटील, बाबजी वड्ड, शरद पाटील विष्णू शिरगावे व शाहू फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी आभार श्री प्रशांत गुरव सर यांनी मांडले