प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर - विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले :
शिरोली (तालुका हातकणंगले)-येथील शाळेत विद्यार्थाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व पालक,समाज यांच्यात आपुलकीचे नाते निर्माण करण्यात रेशमा वासकर यांचे बहुमुल्य योगदान आहे ,असे प्रतिपादन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरूण सोडगे यांनी केले.शिरोली नंबर तीन शाळेत सदिच्छा कार्यक्रमात ते बोलत होते .अध्यक्षस्थानी एकनाथ संकपाळ होते.
शाळेच्या वतीने रेशमा वासकर व सातापा वासकर यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्या मनिषा संकपाळ व अरूण सोडगे,एकनाथ संकपाळ यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माधुरी सोडगे,शिल्पा वठारे,मनीषा संकपाळ,नईम अत्तार,राजेश जाधव,नारायण पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमास सीमा खटाळे , सुजाता केंगार,चारूशीला चंदनशिवे,शोभा लंबे,विद्या पाटील यांचेसह पालक विद्यार्थी उपस्थित होते.सुत्रसंचालन गोरखनाथ पाटील यांनी केले.
फोटो ओळ शिरोली येथे सदिच्छा कार्यक्रमात रेश्मा वास्कर व साताप्पा वासकर यांचा सत्कार करताना ग्रामपंचायत सदस्य मनीषा संकपाळ अरुण सोडगे एकनाथ संकपाळ व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य