मा. ना. हसन मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री, कोल्हापूर यांना कोल्हापूर प्रेस क्लब कडून निवेदन
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री राहुल रेखवार यांनी काल जिल्हाधिकारी कार्य़ालयात पत्रकारांना बैठकीचं आमंत्रण देऊन त्यांना अपमानीत केलं आहे. कोल्हापूरचे पत्रकार हे खोट्या बातम्या देऊन आपले पोट भरत आहेत. असं काही अधिकाऱ्यांसमोर विधान करुन कोल्हापुरातील समस्त पत्रकारांचा अपमान केला आहे.
बैठकीसाठी वेळ देऊन तब्बल तीन तास ताटकळत ठेवले. इतकेच नाही तर दालनात बोलावून उद्धट वर्तन करत अरेरावी करण्याचा प्रयत्न केला आहे. वारंवार पत्रकारांबद्दल आकस ठेवून अपमानीत वागणूक देणाऱ्या राहुल रेखावार यांची कोल्हापूर जिल्ह्यातून तत्काळ बदली करावी अशी मागणी कोल्हापूर प्रेस क्लबच्या माध्यामातून आम्ही करत आहोत. पत्रकारांना करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात प्रवेश मिळण्याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन देखील त्याची अंमलबजावणी करण्यास एक आठवडा टाळाटाळ केली. वारंवार आठवण करुन देऊन देखील यांनी आपल्या आदेशाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं आहे. हा आपला तसेच कोल्हापूरच्या जनतेचा देखील अपमान आहे.
श्री राहुल रेखावार यांची वादग्रस्त कारकिर्द
1. शुक्रवार दि – 6 ऑक्टोबर रोजी सर्किट हाऊसच्या दानलात बैठक पार पडली. आपण दोन्ही बाजू ऐकून घेऊन पत्रकारांना मंदिरात प्रवेश देण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र आपण आदेश देऊनही त्या विषयावर कॉम्प्रोमाईज करणार नाही असं विधान केलं. त्यानंतर प्रवेश देण्याबाबत प्रत्यक्षात शुक्रवार दि. 13 ऑक्टोबर ही तारीख उजाडली.
2. दोन महिन्यांपूर्वीच कोल्हापूरच्या जनतेला रेडिओ मार्फत पुराची भिती घालून संपूर्ण कोल्हापूर शहराला वेठीस धरलं. अनेक गावांना स्थलांतरीत होण्यास भाग पाडलं. मात्र पंचगंगा नदीची पाणी पातळी नियमितपणे वाढून कमी झाली.
3. मराठा आरक्षणाच्या बाबतीत बोलावलेल्या बैठकीत मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चुकीची माहिती देऊन दोन समाजात संभ्रम निर्माण केल्याचा मराठा संघटनांचा आरोप रेखावार यांच्यावर आहे. याबाबत त्यांना माफी देखील मागावी लागली आहे.
4. 7 जून रोजी कोल्हापूर शहरात उसळलेल्या दंगलीकडे देखील रेखावार यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
5. राहुल रेखावार यांनी व्हॉट्सअप ग्रुपवरून मध्यरात्री पत्रकारांबाबत आक्षपार्ह मेसेज टाकून स्वत: लेफ्ट झाले होते. याबाबत तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
6. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा पहिलाच कोल्हापूर दौरा होता त्यावेळी पत्रकारांना तुम्ही बाहेर थांबला तरी चालेल असं बोलले. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी कार्य़ालयाबाहेर येऊन माध्यमांशी बोलावं लागले.
7. श्री रेखावार यांच्या दालनात संघटना निवेदन देण्यासाठी गेल्यानंतर वृत्तपत्राच्या फोटोग्राफर यांचा पोलिसांकरवी कॅमेरा काढून घेण्याचे आदेश दिले होते.
8. माहितीच्या अधिकारावरुन बातमी छापल्यानंतर संबंधित प्रतिनिधींना कायदेशीर नोटीस पाठवून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना देखील न्याय मागणं कठिण झालं आहे. नागरिकांमधून देखील यांच्याबाबत संताप आहे. हे जिल्हाधिकारी जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आहेत की कोल्हापूरकरांना त्रास देण्यासाठी आले आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर जिल्हाधिकारी यांची अशीच वर्तणूक राहणार असेल तर शासनाच्या आगामी दसरा महोत्सवावर कोल्हापुरातील माध्यमातील पत्रकारांनी का बहिष्कार टाकू नये. यांचं उत्तर मंत्री महोदय आपणच जनतेला द्यावं.
प्रत सादर -
1) मा. श्री. एकनाथजी शिंदे,
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
2) मा. श्री. देवेंद्र फडणवीसजी
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
3) मा. श्री. अजितदादा पवार
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
4) मा. श्री. विजय वडेट्टीवार
विरोधी पक्षनेते, विधानसभा