प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर-आताच्या सरकारने आम्हा महिलांना आरक्षण जाहीर केल्या बद्दल आम्हा महिलां कडून सरकारचे अभिनंदन.पण हे आरक्षण मिळायला काही कालावधी जाणार आहे.पण आताच्या वाढ़त्या महागाईला आमचा जीव वैतागला आहे. तेव्हा तुम्हीच सांगा सरकार मायबाप आमच्या सारख्या हातावर पोट असणारी ,रोजंदारी आणि काबाड कष्ट करून जगणारयां महिलांनी जगायचे कसे?पूर्वी सिंलेडर 400 रु.होते आता 1110 होऊन परवा रक्षाबंधन भेट म्हणुन 200रु.कमी करून 910 रु.केले .तुरडाळ अगोदर 70 ते 75 रु.होती आता 180 रु.झाली.आणि साखर 28 रु.होती ती आता 44 रु.झाली आहे.अशा कितीतरी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनांला भिडल्या आहेत.याच्या मुळे आमच्या सारख्यांचे जगणे मुश्कील झाले.
सरकारने आनंदाचा शिधा दिला पण तो शिजवायचा कशावर एकतर रॉकेल मिळणारेही बंद केले आहे.कोरोना काळात सर्वाना मोफत धान्य दिले पण जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी होईनात.या कडे कोणाही लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही .जो-तो स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या खुर्ची साठी धडपडत असतो.सरकारने 75 वर्षे पूर्ण झालेल्या वयोवृध्दाना मोफत एसटी सेवा जाहीर केली पण त्यांना जास्त गरज आहे ती मोफत औषधोपचाराची एसटीची मोफत सेवा द्यायची असेल तर त्याची गरज आहे ती गरीब विद्यार्थाना द्यावी.आपण महिलांना आरक्षण जाहीर केले ते बरोबर आहे पण लाभ घेण्यासाठी आम्हा महिलांना जगू तर द्या.हे आरक्षण कसे आहे एका गावात मालकांने गावातील लोकांना जेवणाचे आंमत्रण देऊन चुल बंद ठेऊन जेवायला येण्याचे निमंत्रण दिले.पण काही गावकरी मंडळीही हुशार होती ती आपापल्यात चर्चा करत जेवण कधी आहे तर त्यातील एक जण म्हणतो मालकांच्या नातवाच्या बारश्याला .अजून मालकांच्या मुलाचं लग्न नाही ,कधी होईल माहिती नाही ,मुलं झाली तर नातु होईल की नात पण जेवणाच आंमत्रण मात्र नक्की.त्याच प्रमाणे आरक्षणाचे आहे आरक्षण कधी लागू होणार तर मतदार संघाची पुनर्रचना झाल्यावर,पुनर्रचना कधी तर जणगणना झाल्यावर ,जणगणना कधी तर विद्येयक आल्यावर आणि विद्येयक कधी तर जातवार जणगणना करण्याचा गुंता सुटल्यावर तर हे आरक्षण केंव्हा द्यायचे तेंव्हा द्या पण आताची वाढ़ती महागाई कमी करून आम्हा महिलांना काही दिवस जगू द्या अशी महिला वर्गातुन मागणी होत आहे.