प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- सभाजीनगर येथे ओम गणेश कॉलनीत रहाणारा सुरज जयकुमार शिंदे (वय 27) याने बुधवारी रात्री एकच्या सुमारास रहात्या घरी किचन मध्ये असलेल्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.
हा प्रकार समजताच त्यांच्या नातेवाई कांनी गळफास घेतलेल्या स्थितीत खाली उतरवून सुरज याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. कोल्हापूरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते जयकुमार शिंदे यांचा मुलगा आहे.या घटनेने त्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.