प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी : संभाजी चौगुले :
कोल्हापूर परिमंडळ : दि.6 ऑक्टोबर 2023 रोजी पन्हाळा येथे महावितरण व विद्युत निरिक्षक कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्युत सुरक्षा जनजागरण फेरी काढण्यात आली. पन्हाळ्यातील बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा ते शिवाजी महाराज मंदिर असा फेरीचा मार्ग होता.
त्यानंतर प्रेस क्लब हॉल येथे विद्युत सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन केले होते. सदर कार्यशाळेस कोल्हापूर ग्रामिण विभाग 1 चे कार्यकारी अभियंता दीपक पाटील, विद्युत निरीक्षक शकील सुतार यांनी मार्गदर्शन केले. यात पन्हाळा, कोडोली व शाहूवाडी उपविभागातील जनमित्रांनी सहभाग नोंदविला. यशस्वितेसाठी उपकार्यकारी अभियंता रणजित पाटील यांनी परिश्रम घेतले.