प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अकरा जिल्हयाच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली.त्यात कोल्हापूरचे नवे पालकमंत्री मा.हसन मुश्रीफसो यांची निवड करण्यात आली.
पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित होत्या.या निवडीने मुश्रीफ साहेबांची इच्छा पूर्ण झाली म्हणायला हरकत नाही.पुणे जिल्हयाचे पालकमंत्री म्हणुन मा.अजित पवार यांची निवड करण्यात आली.इतर जिल्हयाचे पालकमंत्री म्हणुन खालील प्रमाणे सोलापूर -चंद्रकांतदादा पाटील,अकोला -राधाकृष्ण विखे पाटील,अमरावती-चंद्रकांतदादा पाटील,भंडारा -विजयकुमार गावित,बुलढ़ाणा-दिलीप वळसे पाटील,गोंदिया-धर्मरावबाबा आत्राम ,बीड -धंनजंय मुंडे ,परभणी -संजय बनसोडे , नंदुरबार -अनिल भा.पाटील आणि वर्धा-सुधीर मुनगुंटीवार यांच्या निवडी केल्या आहेत.