प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव काळात विशेष कामगिरी केल्याबद्दल पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात करुन गौरव करण्यात आला. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव या काळात नागरिकांची आणि भाविकांची गर्दी होऊनही वहातुकीचे योग्य नियोजन करून वाहतूक सुरळीत ठेऊन कोणताही अनुचित प्रकार घडला नाही या बद्दल वहातुक शाखे कडील 5 पोलिस अधिकारी आणि 103कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच या उत्सव काळात मिरवणूका शांततेत पार पाडल्याबद्दल योग्य नियोजन करून विशेष कामगिरी केलेल्या 8पोलिस अधिकारी आणि 70 पोलिस कर्मचारी यांच्यासह जिल्हा विशेष पोलिस कडील 2पोलिस अधिकारी आणि 24कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,मा.निकेश खाटमोडे -पाटील, मा .श्रीमती जयश्री देसाई, मा.सुवर्णा पत्की ,मा.अजित टिके .या वरिष्ठ पोलिस अधिकारीसह स्था.गु.शा.पो.नि.श्री.महादेव वाघमोडे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक मा.तानाजी सावंत यांनी केले.