प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -कोल्हापुर शहरात बी ,सी,डी ,आणि ई वॉर्डातील नागरिकांना आता एक दिवसा आड पाणी पुरवठा होणार आहे.पाणी टंचाई सुरळीत होई पर्यंत ही समस्या भासणार आहे.या वर्षी पाऊस कमी -जास्त प्रमाणात झाल्याने धरणाची पातळी कमी होत असल्याने नदी पात्रात पाण्याची पातळी कमी होत आहे .
या मुळे 14 तारखे पासून आझाद गल्ली ,मटण मार्केट ,लक्ष्मीपुरी ,शाहुपुरीतील 5,6,7,आणि 8वी गल्ली,सुतारवाडा ,रविवार पेठ,भवानी मंडप ,अकबर मोहल्ला आणि महाराणा प्रताप चौक या परिसरात एक दिवसा आड पाणी पुरवठा होणार असून महाद्वार रोड,बिनखांबी गणेश मंदीर ,रंकाळा टॉवर ,शिवाजी पेठ,गंगावेश ,ब्रम्हपुरी ,आणि सिध्दार्थनगर या परिसरातील नागरिकांना 15 तारखेपासून एक दिवसा आड पाणी पुरवठा होणार असलेने नागरिकांनी उप्लबध पाणी पुरवठा काटकसरीने वापरुन कोल्हापुर महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.