महालक्ष्मी मंदीर परिसरात प्रशासन आणि चप्पल स्टँड धारकांत जोरदार वादावादी.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापूर-महालक्ष्मी मंदीर परिसरात आज प्रशासन आणि चप्पल धारकात चप्पल  स्टँड काढ़ण्यावरुन जोरदार वादावादी झाली.या मंदीर परिसरात दर्शनासाठी येणारयां भाविकासाठी चप्पल  स्टँडची सुविधा केली होती.या मंदीरला लागून असलेने मंदीराजवळील भिंत पूर्णपणे झाकल्याने भाविकांना भिंतीचे मुळ स्वरुप दिसत नव्हते.

नवरात्रोत्स्वाच्या निमीत्ताने मंदीर परिसरात साफ सफाई सुरु असून कोल्हापूर महानगरपालिचेच्या अतिक्रमण विभागाकडुन या परिसरात असलेल्या खाजगी दुकानदारांवर कारवाई करीत असता काही दुकानदारांनी स्व्तःहून दुकाने हटविली पण चप्पल  स्टँड धारकांनी विशेष करून महिलांनी जोरदार विरोध करून जोरात वादावादी झाली.या वेळी पोलिस  बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवला होता.या महिलाचे म्हणणे असे की,आमची दुकाने गेल्या वीस -पंचवीस वर्षांपासून आहेत.याबाबत कोर्टात वाद चालू असताना अचानक पणे येऊन कारवाई करणे चुकीचे आहे.नोटीस नाही काही नाही असे आमची दुकाने काढ़ली तर आम्ही जायचे कोठे असे म्हणत महिलांना अश्रु अनावर झाले होते.महापालिकेने अतिक्रमण विरोधात कारवाई करून या मंदीर परिसरात जी महालक्ष्मी मंदीराची भिंत आहे तिचे मुळ स्वरुप कसे आहे यांची भाविकांना माहिती व्हावी या उद्देशाने या भिंतींला चिकटून असलेली दुकाने पूर्ण पणे झाकली गेल्याने ते हटविण्याचा प्रयत्न महानगरपालिकेने केला.

Post a Comment

Previous Post Next Post