प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर -काही रुग्णालये आणि काही डॉक्टर बेधडक रुग्णाच्या नातेवाईकांची लुट करीत आहेत.एखाद्या रुग्णाला त्याचे नातेवाईक शक्यतो सरकारी रुग्णालयातच उपचारासाठी दाखल करतात.काही प्रमाणात तेथे औषधोपचार होतो पण जे काही इंजेक्शसह लागणारी औषधे बाहेरुन आणावयास सांगतात.पेंशटच्या नातेवाईकांची परिस्थिती पाहुन त्या रुग्णालयातील काही जण आपल्या ओळखीच्या खाजगी रुग्णालयात जाण्याचा मौल्यवान सल्ला देतात कारण त्या बदल्यात त्याना काही प्रमाणात मोबदला मिळतो.
तेथे गेल्यावर रुग्णांच्या नातेवाईकांना तेथील डॉक्टर सांगेल त्या ठिकाणीच टेस्टसह औषधे घ्यावी लागते.जर बाहेरून घेतले तर ते चालत नाही कंपनी वेगळी आहे असे म्हणत ते बदलण्यास सांगतात.कारण संबंधित मेडीकलशी साटेलोटे असते.यात पेंशटच्या टेस्ट पासून ते ऑपरेशन प्रर्यत काहीची टक्केवारी ठरलेली असते.काही मेडीकलल्स डॉक्टरांच्या चिठी शिवाय कुणालाच औषधे देत नाहीत जर एखाद्याने हुशारी दाखवत संपूर्ण मेडील्स पालथी घातली तरी ती औषध मिळत नाहीत कारण कंपनी फक्त डॉक्टरना औषधे पुरविते.एखाद्या इंजेक्शनची मुळ किमत 500/रु.असेल त्यांच्या हॉस्पिटलमध्ये 1,800/रु.आकारले जाते .
एखाद्याला संसर्ग झाला असेल तर डॉक्टरांनी लिहून दिलेले प्रतिजैविक 540 /रु.इतर कंपनीकडून 150 रु.आणि जेनेरिक 45 /रु.बाहेर अल्ट्रासाऊंड चाचणी केली तर 750 रु.यात काहीचा मोबदला 300रु.आणि MRI वर संबंधिताचे कमीशन दोन ते तीन हजार रुपये.एखाद्याला झटका आला तर डॉक्टर म्हणतात स्ट्रेप्टो किनेज इंजेक्शन द्यायला पाहिजे म्हणत 9000 रु.घेतले जाते.पण त्याची खरी किमंत 700 रु.ते 900रु.आहे.जर एखाद्याच्या ह्र्दयात ब्लॉकेज झाले तर स्टेंट टाकायचा असेल तर काही डॉक्टर दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो असे सांगितले जाते पण त्याची बाजारात खरी किमंत चोवीस हजारा पासून ते पस्तीस हजार रुपये प्रर्यत आहे.
या अशा प्रकारच्या फसवणुकीत काही औषध कंपन्यासह काही डॉक्टरांचाही समावेश आहे.यात काही रुग्णांच्या नातेवाईकांची लुट होते पण ते तक्रार करीत नाहीत कारण त्यांचा रुग्ण लवकरात लवकर बरा कसा होईल याकडे लक्ष असते. जर तक्रार केली तर रुग्णावरील उपचार थांबतील या भितीने कोणी तक्रार करीत नाहीत याचाच फायदा असे काही हॉस्पिटलसह काही डॉक्टर घेत आहेत.हे कुठतरी थाबलं पाहिजे .अशा लुटी मुळेच रुग्णाचे नातेवाईक कंगाल होऊन काही डॉक्टरसह मेडीकल्सही मालामाल होत आहेत.