प्रेस मीडिया लाईव्ह :
विशेष प्रतिनिधी: संभाजी चौगुले :
कोल्हापूर परिमंडळ : महावितरणकडून तळसंदे साखरवाडी ग्रामस्थांशी विद्युत सुरक्षा संवाद साधण्यात आला. विद्युत सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाच्या काळजीबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. गावातील लोकवस्तीतून गेलेली 33 केव्ही विद्युत वाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम प्रस्तावित असल्याची माहिती कार्यकारी अभियंता दिपक पाटील यांनी गावभेटीदरम्यान दिली. यावेळी उपसरपंच संतोष सुवासे, कोडोली उपविभागीय अभियंता सुरेखा शेळके, पारगाव शाखा अभियंता कोमल पाटील, सहाय्यक अभियंता अण्णासो आंबवडे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्यकारी अभियंता पाटील यांनी तळसंदे ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट दिली. या भेटीत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची सविस्तर माहिती दिली. तद्नंतर उपसरपंच संतोष सुवासे यांनी 20 एकर जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वस्त केले.