विना परवाना मिरवणूक काढल्या प्रकरणी जुना बुधवार पेठ तालमीच्या माजी उपमहापौरसह 40 ते 50 कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापूर - विना परवाना मिरवणूक काढण्यारयां संयुक्त जुना बुधवार पेठ तालमीच्या माजी उपमहापौरसह 40 ते 50 कार्यकर्त्यावर गु न्हा दाखल करून  लक्ष्मीपुरी पोलिसांनी साऊंड सिस्टिमही जप्त केला  आहे.याबाबतची तक्रार लक्ष्मीपुरीचे पो.कॉ.एकनाथ कळवे यांनी दिली होती.

या तालमीला गणेश विसर्जन मिरवणूकीची परवानगी दिली होती.पण त्यांनी 28 तारखेला न काढ़ता 29 तारखेला काढ़ून वाहतुकीस अडथळा करून काही  कार्यकर्त्यांनी पोलिस कर्मचारी यांच्याशी हुज्जत घालून विना परवाना मिरवणूक काढल्या बद्दल  लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हें दाखल केले.यात मंडळाच्या कार्यकर्त्यासह ट्रयकटर चालक ,जनरेटरच्या मालका बरोबर ध्वनीयंत्रणेच्या मालकासह साउंड सिस्टिमही जप्त केला.गुन्हें दाखल केलेल्यात केदार शिंदे,अक्षय घाटगे ,कल्पेश नाळे,जयशंकर नष्टे ,तेजस मोहिते   अजित मंडलीक ,विनीत पाटील,ललीत कराळ,अमेय कांबळे (सर्व रा.जुना बुधवार पेठ) मंडळाचे समर्थक उदय भोसले,सुशांत महाडीक आणि माजी उपमहापौर दिगंबर फराकटे  यांच्यासह 40 ते 50 जणांचा समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post