इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने 'माझी माती माझा देश' उपक्रमातंर्गत अमृत कलश यात्रा' मोठ्या उत्साहात संपन्न



 प्रेस मीडिया लाईव्ह : 

 इचलकरंजीत :  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावांतर्गत 'मेरी मिट्टी मेरा देश' अर्थात 'माझी माता माझा देश' या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि. ०९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत इचलकरंजी महानगरपालिकेमार्फत पंचप्रण शपथ, विरांना वंदन, वसुधा वंदन, शिलाफलकाचे अनावरण इ. विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविणेत आलेले आहेत.

              या अभियानाच्या समारोपीय कार्यक्रमातील 'अमृत कलश' यात्रे अंतर्गत दि. १२ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत शहरातील महानगरपालिकेच्या चार विभागीय कार्यालयामार्फत सर्व वॉर्ड मध्ये घरोघरी जावून एक मुठ माती/ तांदुळ कलशामध्ये संकलीत करणेत आलेले असून सदर कलशांचे महानगरपालिका स्तरावर एकत्रीकरण करणेचा कार्यक्रम आज मंगळवार दि. १० ऑक्टोंबर रोजी श्रीमंत नारायणराव घोरपडे नाटयगृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  

     या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेत आलेले होते.यामध्ये प्रामुख्याने महात्मा गांधीजी पुतळा ते श्रीमंत नारायणराव घोरपडे नाटयगृहापर्यंत अमृत कलश यात्रेचा शुभारंभ तसेच श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात अमृत कलश एकत्रीकरण , पंचप्रण शपथ, विरांना वंदन या अनुषंगाने स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सत्कार आमदार प्रकाशराव आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे,  माजी नगराध्यक्षा ॲड.अलका स्वामी, उपायुक्त सोमनाथ  आढाव तसेच शहरातील स्वातंत्र्य सैनिकांचे वारस यांच्या  उपस्थितीत करणेत आला. 

          त्याचबरोबर यावर्षीच्या घरगुती गणेश विसर्जनासाठी महानगरपालिकेच्या वतीने तयार केलेल्या कृत्रिम गणेश मूर्ती विसर्जन कुंड सजावट स्पर्धेंचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करणेत आला.

     यावेळी रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतन प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका अलका शेलार, शिक्षक राजेंद्र घोडके, अजित शंभुशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर समुहनृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

      या कार्यक्रमासाठी माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, अमृत भोसले, डी.के.ए.एस. सी. महाविद्यालय , आक्काताई   रामगोंडा पाटील महाविद्यालय , गोविंदराव हायस्कूल, बापुजी साळुंखे हायस्कूलचे एन.सी.सी. एन.एस.एस.चे विद्यार्थी , रविंद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळेचे लेझीम पथक तसेच शहरातील विविध सामाजिक/स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, यांचेसह मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, लेखा परीक्षक आरती पाटील- खोत, सहा आयुक्त केतन गुजर, कामगार अधिकारी विजय राजापुरे, विद्युत अभियंता संदीप जाधव, सहा आयुक्त सचिन पाटील, खरेदी पर्यवेक्षक शितल पाटील, महिला बाल कल्याण अधिकारी सीमा धुमाळ, सहा अभियंता राधिका हावळ, क्रीडा अधिकारी संजय शेटे, मुख्याध्यापक शंकर पोवार, विधी अधिकारी खदिजा सनदी, ग्रंथपाल बेबी नदाफ, प्रा. चंद्रकांत कोरे, ‌ प्रा. संतोषी जावीर, प्रा.प्रमिला सुर्वे , प्रा.हाळवणकर मॅडम, प्रा. विनायक भोई, प्रा.एम.एस.मुलाणी  यांचेसह महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख, प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक-

शिक्षिका, महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


         

Post a Comment

Previous Post Next Post