प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा पंधरवडा ' स्वच्छता पंधरवडा ' म्हणून साजरा करणेत येतो. या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करणेचे निर्देश देणेत आले होते.शहरातील सर्व ६ एन. यु. एच. एम. अंतर्गत नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आणि इचलकरंजी मेडिकल असोसिएशन यांच्या सहकार्याने इचलकरंजी महानगरपालिका आरोग्य विभागाकडील सफाई कर्मचारी (सफाई मित्र) यांचेसाठी आरोग्य सुरक्षा शिबीराचे आयोजन केले होते.
शहरातील तांबे माळ येथील नागरी आरोग्य केंद्रामध्ये सफाई मित्र आरोग्य सुरक्षा शिबीराचा प्रतिनिधीक स्वरूपात शुभारंभ महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे आणि उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, माजी नगरसेवक सागर चाळके, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करणेत आला.
प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये एकुण १२० (स्त्री -पुरुष) कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करणेत आली. या शिबिरात आवश्यकतेनुसार रक्त तपासणी,ई.सी.जी. आणि एक्स रे या तपासण्या करून औषधोपचार करणेत आले.
या शिबिरासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रसाद दातार, मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.शरद मिठारी, सचिव डॉ.राजेश कुंभार, डॉ.एम.ए. बोरगावे, डॉ.अमृता शिनगारे, डॉ अमोल भोरे, डॉ.विशाल पारकर, डॉ.एस.एस. कोडोलीकर, डॉ. शोभा लांडे, डॉ.स्नेहल मिठारी, डॉ.मिनल पडीया, डॉ.आरुषी काजवे, डॉ.आदित्य कोळी, डॉ.दिनेश चव्हाण, डॉ.सॅमसन घाटगे, डॉ.वैभव साळे, डॉ, आदगोंड पाटील, डॉ.प्रसाद भोई, डॉ, रत्नाकर पाटील, डॉ.रितेश शहा यांचेसह सर्वच नागरी आरोग्य केंद्राकडील परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता तसेच आशा वर्कर यांचे सहकार्य लाभले.