प्रेस मीडिया लाईव्ह :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावांतर्गत 'मेरी मिट्टी मेरा देश' अर्थात 'माझी माता माझा देश' या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि. ०९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत इचलकरंजी महानगरपालिकेमार्फत पंचप्रण शपथ, विरांना वंदन, वसुधा वंदन, शिलाफलकाचे अनावरण इ. विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविणेत आलेले आहे.
या अभियानाच्या समारोपीय कार्यक्रमातील 'अमृत कलश' यात्रेअंतर्गत दि. १२ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत शहरातील महानगरपालिकेच्या चार विभागीय कार्यालयामार्फत सर्व वॉर्ड मध्ये घरोघरी जावून एक मुठ माती/ तांदुळ कलशामध्ये संकलीत करणेत आलेले असून सदर कलशांचे महानगरपालिका स्तरावर एकत्रिकरण करणेचा कार्यक्रम उद्या दि. १० ऑक्टोंबर २०१३ रोजी सकाळी १०.०० वाजता श्रीमंत नारायणराव घोरपडे नाटयगृह येथे आयोजित करणेत आलेला आहे. सदर कार्यक्रमा अंतर्गत खालील कामांचे आयोजन करणेत आलेले आहे.
१. महात्मा गांधीजी पुतळा ते श्रीमंत नारायणराव घोरपडे नाटयगृह पर्यंत अमृत कलश यात्रेचे आयोजन
२. नाटयगृह येथे अमृत कलश एकत्रीकरण व पंचप्रण शपथ
३. विरांना वंदन व सांस्कृतिक कार्यक्रम
तरी सर्व शहरवासीयांनी तसेच शहरातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी,सामाजिक/स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिकांचे वारस यांनी अमृत कलश यात्रा व आयोजित विविध कार्यक्रमासाठी दि. १० ऑक्टोंबर रोजी सकाळी ०९.३० वाजता महात्मा गांधीजी पुतळा येथे उपस्थित रहावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून करणेत येत आहे.