प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी/प्रतिनिधी -
ईद ए मिलाद अर्थात मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त समीर जमादार युवा मंचच्या वतीने दिल्या जाणार्या यंदाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. गुरुवार 5 ऑक्टोबर रोजी पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार अशी माहिती मंचचे संस्थापक समीर जमादार यांनी दिली.
समीर जमादार युवा मंचच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना दरवर्षी मोहम्मद पैगंबर जयंतीचे औचित्य साधत गौरविण्यात येते. त्यानुसार यंदाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये स्वातंत्र्य सैनिक हाजी रहेमान बाबालाल खलिफा (चाचा) (समाजभूषण पुरस्कार), श्री.रामचंद्र आण्णाप्पा ठिकणे (उत्कृष्ट पत्रकारिता), सौ. सफुरा जावेद पठाण (आदर्श शिक्षिका), कॉ. सदाशिव आंनाप्पा मलाबादे (उत्कृष्ट सामाजिक कार्य), डॉ. अशोक तमन्ना सनदी (उत्कृष्ट वैद्यकीय सेवा), कु.इजाज फयाज मोमीन (उत्कृष्ट खेळाडू) यांचा समावेश आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता म्हसोबा गल्ली नं. 1,मोहमदिया मस्जिद जवळ विक्रमनगर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तसेच भागातील निराधार महिलांना साडी वाटप ,व समीर जमादार युवा मंचच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंचचे संस्थापक समीर जमादार यांनी दिली.