प्रेस मीडिया लाईव्ह :
आज मंगळवार दि.३१ ऑक्टोंबर रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी नगररचना विभागाकडील विविध १० विषयासंबंधीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. या मध्ये प्रामुख्याने
१. एम.आर.टि.पी.ॲक्ट कलम १२७ खालील नोटीसांबाबतचा आढावा
२. मनपा आरक्षणे भूसंपादन प्रकरणांचा आढावा यामध्ये रुग्गे मळा व महासत्ता चौक रस्ता संपादन बाबत.
३. रिंग रोड भूसंपादन बाबतचा आढावा
४. वाहतुकीस कोंडी ठरणाऱ्या रस्त्यांच्या रुंदीकरणाबाबतचा आढावा.
५. महापालिकेच्या सध्या ताब्यात असलेल्या आरक्षित जागा भूखंड यांच्या वरील अतिक्रमण प्रतिबंध करणे बाबतचा आढावा.
६.मोबाईल टॉवर परवानगी बाबत
७. टीडीआर मंजूर करण्यासाठीचे कार्यपद्धती बाबत आढावा.
८. बांधकाम परवानगी विषयक प्रकरणांचा आढावा
९. बी. पी. एम. एस. संगणक सिस्टीम मधील तांत्रिक त्रुटी दूर करणे बाबत.
१०. टि.पी. स्कीम नंबर एक टि.पी. स्कीम नंबर दोन बाबत मोजणी प्रकरणाबाबत या सर्व विषयांवर आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी आवश्यक ती सविस्तर माहिती घेऊन याबाबत तातडीने कार्यवाही करणेच्या सुचना संबंधित विभागास देऊन शहरातील नागरिकांनी याकरिता आवश्यक ते सहकार्य करावे असे आवाहन केले.
या बैठकीस उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, तैमूर मुलाणी, वित्त व लेखा अधिकारी विकास खोळपे सहायक संचालक नगररचना प्रशांत भोसले यांचेसह सहा.नगररचनाकार नितिन देसाई व हरिश्चंद्र पाटील आदी उपस्थित होते.