प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था इचलकरंजी व वेध फौंडेशन इचलरकंजी यांच्या संयुक्त विद्यमाने घरगुती गणपती डेकोरेशन (आरास) स्पर्धा 2023 व आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 हा संयुक्त कार्यक्रम इचलरकंजी येथील भाग्यश्री कॉलनी या ठिकाणी अतिशय उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे स्वागत सौ रेखाताई बिरंजे मॅडम यांनी केले प्रमुख पाहुण्या व सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सौ राखी मुरतले मॅडम यांनी केले. व प्रमुख पाहुण्या सौ. हेमल गजानन सुलतानपूरे यांचा सत्कार परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सौ. रेखाताई बिरंजे व वेध फौंडेशनचे अध्यक्ष सौ रजनीताई शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संस्थेच्या वाटचालीचा आढावा श्री शिवकुमार मुरतले सर यांनी केले.शिक्षक पुरस्कार प्रदान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, शिल्ड व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
1 शरद इंग्लिश मीडियम च्या प्राचार्य कनीज कोतवाल , दिशा अध्यायन व अक्षम्य मुलांची शाळा या विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका *सौ. सविता बाळासाहेब कोळी*, यानंतर बालाजी माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज, इचलकरंजी च्या *प्राचार्य सौ मंजुषा सुनील रावळ* तसेच सर्वोदय विद्यालय इचलकरंजीच्या *मुख्याध्यापिका सौ. आसमा जमीर नदाफ*, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल इचलकरंजीच्या शिक्षिका *सौ. प्रज्ञा योगेश करंदीकर* इत्यादी सर्व मान्यवर शिक्षिकांचा सत्कार कार्यक्रमाचे *अध्यक्ष सौ. हेमल गजानन सुलतानपुरे* यांच्या शुभहस्ते व *सौ.व श्री. डॉक्टर बडबडे* यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सर्व शिक्षिकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर गणेश चतुर्थीच्या काळात घरगुती गणपती (आरास) डेकोरेशन स्पर्धा आयोजित केलेली होती या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रमुख पाहुणे व उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले यामध्ये प्रथम सहभाग प्रमाणपत्राचे वितरण करून यानंतर उत्तेजनार्थ तीन क्रमांक काढण्यात आले, तृतीय क्रमांकाचे तीन पारितोषिक काढण्यात आले, द्वितीय क्रमांकाचे दोन पारितोषिक काढण्यात आले व प्रथम क्रमांकाचे एक असे नऊ पारितोषिके व सहभाग सर्टिफिकेट अशा पद्धतीने 35 स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक रोहित रमेश मस्के* मंगळवार पेठ, द्वितीय क्रमांक
1. सौ गीता श्रीकांत सोलगे, सोलगे मळा द्वितीय क्रमांक
2. सचिन रमेश कांबळे घोडके नगर क्रांती चौक इचलकरंजी, तृतीय क्रमांक
1. सौ.पुष्पा किरण काकडे वैरण बाजार शेळके मळा, तृतीय क्रमांक
2. शशिकांत योगेश भोसले जय भवानी कॉर्नर फॅक्टरी रोड कबनूर, तृतीय क्रमांक
3. सौ पूजा अभिषेक आडमुठे जवाहर नगर पोस्ट ऑफिस जवळ इचलकरंजी, उत्तेजनार्थ
1. सौ. सोनाली अजित टेके शाहूनगर भोने माळ, उत्तेजनार्थ
2. राजेंद्र महादेव बुढे तांबे माळ, इचलकरंजी, उत्तेजनार
3. श्वेता सातपुते सातपुते गल्ली इचलरकंजी, या सर्व स्पर्धकांनी अतिशय सुंदर व रेखीव डेकोरेशन केलेले होते यामध्ये सामाजिक संदेश पर्यावरण पूरक व सुंदर मांडणी अशा विविध टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू चा वापर करून अतिशय सुंदर असे गणपती डेकोरेशन आरास केलेले 35 एक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून सौ. हेमल सुलतानपूर यांनी आपल्या मनोगतामध्ये निवड समितीकडून निवडलेल्या शिक्षिकांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल व त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल संस्थेचे व पुरस्कार प्राप्त शिक्षिकांचे कौतुक केले.व घरगुती गणपती डेकोरेशनच्या स्पर्धेमधील विविध नाविन्यपूर्ण डेकोरेशनच्या निवडीचे परीक्षण करताना परीक्षकांना करावी लागलेली कसोटी व कौशल्य याचे कौतुक केले व संस्थेच्या कार्याचा कमीत कमी वेळेमध्ये केलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व महिलांना मिळत असलेल्या प्रोत्सानाबद्दल अभिमान व्यक्त केले व असेच कार्य समाजाला आदर्श दिशा देण्यासाठी प्रेरित होईल अशी आशा व्यक्त केली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आभार सौ.रजनीताई शिंदे वेध फौंडेशनचे अध्यक्ष यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सरिता पांडव व सौ कविता पाटील यांनी केले.
हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सौ रेखाताई बिरंजे उपाध्यक्ष दीप्ती लोकरे, सेक्रेटरी संगीता हुग्गे, खजिनदार सौ. सरिता पांडव व वेध फौंडेशनचे अध्यक्ष रजनीताई शिंदे सौ. कविता पाटील, सौ.राखी मुरतले, सौ.हिरा आडकी, सौ.कविता शिंगाडे, सौ.मीनाज शेख, सौ.वायचळ, सौ.दीपा देसाई, सौ. रेशमा कोकणे, सौ.अशा वाघिरे, सौ.सिद्धी जाधव,सौ.आज्ञा पाटील विजया माळी, सौ.अमिता बिरंजे श्री.लक्ष्मण पाटील,श्री राम आडकी व श्री.शिवकुमार मुरतले, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री युवराज मोरे, श्री. मुरलीधर शिंदे, श्री.जोतिबा पांडव इत्यादी मान्यवरांचे व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार लाभले.