महानगरपालिकेत येणारे मोर्चे, शिष्टमंडळ यांचे निवेदन उपायुक्त यांचेकडून स्विकारणेत येणार.

 







     


 प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी  :   बुधवार दि. ०४  ऑक्टोबर रोजी तत्कालीन नगरपरिषदेच्या काही माजी नगरसेवकांचे नेतृत्वाखाली शहराच्या एका भागातील नागरीकांनी कोणतीही पूर्व कल्पना न देता काही मागण्यांसाठी महापालिकेवर मोर्चा काढलेला होता. यावेळी मा. आयुक्त पूर्वनियोजित कार्यालय बैठकांमध्ये व्यस्त असल्याने  आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार संबंधितांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेऊन संबंधित विभाग प्रमुखांना उचित कार्यवाहीचे निर्देश उपायुक्त यांनी दिले. त्यानंतरही संबंधितांनी आयुक्तांना भेटण्याची मागणी लावून धरली. परंतु नियोजित कार्यालयीन कामकाज व बैठकांमुळे ही मागणी मान्य करणे शक्य नव्हते. यानंतर संबंधितांनी आयुक्त दालनाबाहेर घोषणाबाजी करून कार्यालयीन कामकाजात व्यत्यय निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक मोर्चा काढण्या पुर्वी पोलिसांची परवानगी घेणे अनिवार्य असते आणि त्या परवानगीसह संबंधित शासकीय कार्यालयाला आगाऊ सुचना देणेदेखील आवश्यक असते. नागरीकांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन संवेदनशील, आहे तथापि यामुळे मनपाच्या कामकाजाबाबत जनमानसात नाहक चुकीची प्रसिध्दी झाली, हे उचित नाही.

अभ्यागतांना पुर्व वेळ निश्चिती (Appointment) शिवाय भेट घेण्यासाठी धोरण निश्चित केले आहे. पुर्व नियोजित बैठका आणि मनपाच्या विविध विभागाकडील अनेक संचिकांवर निर्णय घेण्यासाठी लागणारा वेळ तसेच व्ही.सी. व्दारे व प्रत्यक्ष उपस्थितीव शासनाच्या विविध विभागाकडील विविध बैठका, महत्वाचे दूरध्वनी, मोबाईलवरील संभाषण, न्यायालयीन तसेच अन्य तातडीचे बाबी व्यस्ततेमुळे निवेदन स्विकारणेस वेळ देणे  आयुक्त यांना शक्य होत नाही. त्यामुळे शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारण्या करिता विलंब होऊन गैरसमज वाढून संबंधितांमार्फत अशोभनीय घोषणाबाजी झाल्याचे दिसते.

महानगरपालिकेकडे येणाऱ्या शिष्टमंडळांना ताटकळत रहावे लागू नये तसेच त्यामुळे कार्यालयीन कामकाजात व्यत्यय येऊ नये या उद्देशाने निवेदन स्विकारण्यासाठी उपायुक्त यांना प्राधिकृत करण्याचा आदेश यापुर्वी तत्कालीन  प्रशासक यांनी निर्गमित केला आहे.

महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवेदने देण्यासाठी येणाऱ्या शिष्टमंडळांची संख्या वाढण्या शक्यता विचारात घेता यापुर्वीचा आदेश हा काही सुधारणेसह पुर्नजिवीत करणेत आलेला  आहे.  दि. ०५ सप्टेंबर २३ रोजीचे आदेशानुसार नियुक्त उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी आणि त्यांच्या अनुपस्थितीत अन्य उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी तसेच संबंधित विभागप्रमुख यांचेकडून यापुढे  मोर्चा/ शिष्टमंडळांचे निवेदन स्वीकारतील.

     उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी तसेच विभाग प्रमुख यांनी या आदेशासह तत्कालीन प्रशासक यांनी दिलेल्या आदेशानुसार सर्व तरतूदीचे पालन करुन नियमानुसार आवश्यक ती पुढील कार्यवाही करावी असे आदेश आयुक्त तथा प्रशासक  यांनी दिलेले आहेत.

    याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहे.



         

Post a Comment

Previous Post Next Post