प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निधी मधुन मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी विविध विकास कामे सुचविली जातात. यामधील काही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली करणेत येतात. अशा सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी उपायुक्त तैमूर मुलाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बुधवार दि.२५ ऑक्टोंबर रोजी बैठकीचे आयोजन केले होते.
सदर बैठकीत महानगरपालिका क्षेत्रामध्ये राबविण्यात येत असलेल्या प्रगतीतील व प्रस्तावित विकास कामांचा आढावा मा. आयुक्त यांनी घेउन याकामा संदर्भात येणाऱ्या अडचणी व त्रुटी बाबत विचार विनिमय करणेत आला. तसेच सर्व विकास कामे नियोजित वेळेत व गुणवत्ता पुर्वक होणेसाठी दोन्ही विभागांणी समन्वय साधून काम करणेच्या सुचना दिल्या
या बैठकीस महानगरपालिकेचे शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता संजय बागडे यांचेसह सार्वजनिक बांधकाम विभाग हातकणंगले उप अभियंता शिवाजी पाटील, शाखा अभियंता सतीश शिंदे, संतोष पाटील, प्रविण मोरे , कनिष्ठ अभियंता रोहन येडगे आदी उपस्थित होते.