प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज शनिवार दि.२८ ऑक्टोंबर रोजी महर्षि वाल्मिकी यांच्या जयंती निमित्त ( तिथीनुसार ) महानगरपालिका सभागृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस आयुक्तांचे स्वीय सहायक सदाशिव शिंदे यांच्या हस्ते आणि कामगार नेते तथा इचलकरंजी वाल्मिकी म्हेतर समाजाचे अध्यक्ष राजु रजपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे,सदा जाधव, गणेश शिंदे, भारत कोपार्डे, अविनाश रंगाटे,सचिन शेडबाळे, दिपक कोळी आदी उपस्थित होते.
Tags
इचलकरंजी