गांधीजी व शास्त्रीजी राजकारण आणि नीती यांचे एकजीनसीत्व महत्त्वाचे मानत.....प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी ता.२ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या जीवन कार्यातून दिलेला संदेश अर्थात गांधीवादी विचारधारा आणि थोर स्वातंत्र्यसैनिक व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या जीवन कार्यातून साधेपणा आणि कणखरपणा यांची दिलेली शिकवण अतिशय महत्त्वाची आहे. गांधीजी आणि शास्त्रीजी राजकारण आणि नीती यांचे एकजीनसीत्व महत्त्वाचे मानत होते. पण आज आणि तिचे थैमान आपल्याला बघायला मिळते. अशावेळी गांधीजींची शिकवण आणि शास्त्रीजींचा साधेपणा व कणखरबाणा या दोन्हींचा अंगीकार केल्यास राजकीय,सामाजिक, आर्थिक ,सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्राची समतेच्या दिशेने वाटचाल होण्यास निश्चितच मदत होईल. आणि तसा अंगीकार करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि थोर स्वातंत्र्य सैनिक व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन करतांना बोलत होते. यावेळी तुकाराम अपराध यांच्या हस्ते गांधीजी व शास्त्रीजी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रारंभी हरित क्रांतीचे जनक डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी दयानंद लिपारे, डी.एस. डोणे , पांडूरंग पिसे, राजन मुठाणे, शकील मुल्ला, रामभाऊ ठीकणे यांनी गांधी विचारांवर मनोगते व्यक्त केली.तसेच अन्वर पटेल यांच्या हस्ते डी.एस. डोणे व मनोहर जोशी यांचा वाढदिवसानिमित्त ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला.

प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, गांधीजीनी साध्य आणि साधन या दोहोंच्या  शुद्धतेचा आग्रह  धरला.भारत शांततेच्या मार्गाने स्वतंत्र होईल आणि पुढे जागतिक शांततेसाठीही काम करेल याची त्यांना खात्री होती. आदर्श राजकारणात युद्धाला स्थान असू शकत नाही ही त्यांची धारणा होती . अहिंसक मार्गानेच अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे .शारीरिक श्रमांची प्रतिष्ठा दुर्लक्षित करता कामा नये.किंबहूना तीचा गौरव झाला पाहिजे .व्यक्ती आणि समाज निर्भय असले पाहिजेत. उच्च नीच, स्त्री पुरुष असे भेद मानता कामा नये. राज्यव्यवस्था आणि उत्पादन व्यवस्था विकेंद्रीत असली पाहिजे. निसर्ग आणि मानव यांच्या संतुलन राखले पाहिजे .सत्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे .नीती हे सर्व धर्माचे सार आहे. त्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे .हे एकूणच गांधी विचाराचे सार आहे. म्हणूनच त्यांनी तत्वाविना राजकारण, कष्टाविना धन, शिलाविना शिक्षण, सचोटीविना व्यापार, विवेकाविना सुख, नीतीविना विज्ञान ,त्यागाविना पूजन ही सात सामाजिक महापापे सांगितली.यावेळी प्रा.डॉ. एफ.एम.पटेल ,शकील मुल्ला, अशोक मगदूम,मनोहर जोशी आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post