हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्ल्याचा जाहीर निषेध



प्रेस मीडिया लाईव्ह : 

प्रबोधन चळवळीतील आमचे मित्र एक आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक, बिनीचे कार्यकर्ते, प्रतिभावंत कवी, लेखक मा.हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवार ता. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी जो जीवघेणा भ्याड हल्ला झाला त्याचा समाजवादी प्रबोधिनी परिवाराच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत. पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते - लेखकांच्यावर  असे जीवघेणे हल्ले होण्याचे भ्याड प्रकार अलीकडे वाढत आहेत. त्याचा निषेध करावा तितका थोडा आहे.अशा हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करणे ही तपास यंत्रणांची अर्थात शासनाची जबाबदारी आहे. त्यात होणारी दिरंगाई आणि काहीसे होणारे दुर्लक्ष हे अतिशय वेदनादायी आहे. हेरंब कुलकर्णी यांच्या हल्लेखोरांना तातडीने पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशी सर्वच पुरोगामी ,प्रबोधन चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी आहे. हेरंबजी ,प्रतिमाजी काळजी घ्या आम्ही सर्वजण आपल्याबरोबर आहोतच.


प्रसाद कुलकर्णी

 सरचिटणीस, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी

(९८५०८ ३०२९०)

---------------------------------------

हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला


मी प्रतिमा कुलकर्णी, हेरंब कुलकर्णी यांची पत्नी आहे

माझे पती हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी  दुपारी १२.१८ मिनिटांनी शाळेतून परत जाताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. आजारी असल्याने शाळेतून घरी सुनिल कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवर येताना अहमदनगर येथे रासने नगर जवळ जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने मारहाण केली.गाडी अडवून लोखंडी रॉडने दोन्ही पायावर

दोन्ही हातावर पाठीवर आणि डोक्यात रॉडने मारहाण केली. डोक्याला ४ टाके पडले आहेत.  डोक्यावर चा दुसरा फटका सुनिल कुलकर्णी यांनी हाताने अडवला त्यामुळे ते बचावले.अन्यथा डोक्यावर जबर मार बसला असता.ते रस्त्यावर पडले.

त्यानंतर त्यांनी सिव्हील हॉस्पिटल ला उपचार घेतले व तोफखाना पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला. पण ४८ तासात पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही की अजूनही CCTV फॉलोअप घेतला नाही. त्यामुळे आज ही घटना समाजाच्या समोर मी मांडत आहे.

सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला रस्त्यात अडवून रॉड ने जीवघेणा हल्ला करणे हे खूप उद्विग्न करणारे आहे. 

आपण सर्वांनी शासनाकडे या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधावे...

सर आता झोपून आहेत पण तब्येत ठीक आहे. 


 *प्रतिमा कुलकर्णी* 

9921288521

---++++-+------------------+

Post a Comment

Previous Post Next Post